Aurangabad Weather: मराठवाड्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, वाचा औरंगाबादसह कोणते जिल्हे यलो अलर्टवर?

20 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीडमध्येही तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे,

Aurangabad Weather:  मराठवाड्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, वाचा औरंगाबादसह कोणते जिल्हे यलो अलर्टवर?
20 आणि 21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोलीसह बीडलाही यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

औरंगाबाद: पुढील दोन दिवसात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दहा दिवसांपूर्वीच औरंगाबाद आणि संपूर्ण मराठवड्यात (Heavy rain forecast in Marathwada) अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता. आता पुन्हा मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 20 आणि 21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

शहरात शनिवार दुपारपासूनच पावसाला सुरुवात

दरम्यान, औरंगाबाद शहरात शनिवारी दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. शहर तसेच औरंगाबादमधील ग्रामीण भागात काही ठिकाणी वीजेच्या गडगडाटासह पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे उद्याचे गणपती विसर्जनदेखील वरुणराजाच्या साक्षीनेच होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

20 आणि 21 सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस

प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात 20 आणि 21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वीजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यापैकी 20 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीडमध्येही तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ही माहिती, डॉ. के.के . डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून मिळाली आहे.

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पाऊस परतणार

मागील आठवड्यात 11, 12 तारखेला औरंगाबादसह मराठवाड्यातील ग्रामीण भागात तुरळक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर दोन दिवस सूर्यदर्शन झाले नव्हते, मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. मागील दोन दिवसांपासून 16, 17 सप्टेंबरपासून मराठवाड्यात आकाश निरभ्र होते. ऊनही चांगलेच पडू लागले होते. या उन्हामुळे पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून येत्या काही दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात आणखी कुठे असेल पाऊस?

येत्या पाच दिवसात पुन्हा एकदा राज्यात पाऊस जोर धरणार आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांतून हा पाऊस वाढत जाईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यानुसार, 20 सप्टेंबर रोजी गोंदिया, अमरावती, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांसह, धुळे, नाशिक, नंदूरबार, पालघर या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

इतर बातम्या- 

Weather Update: धुळे, नंदुरबारसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Weather Report Today : राज्यातभरात संततधार, औरंगाबादेत पाझर तलाव फुटला, चाळीसगावात पूर, 3-4 दिवस पाऊस कोसळणार

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI