AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाडा: अतिवृष्टीमुळे 14 दिवसात 34 जणांचा मृत्यू, धरणांतून विसर्ग सुरूच, अनेक गावांशी संपर्क तुटला

दरम्यान, सप्टेंबर महिन्यातील मुसळधार पावसाचा मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला. एक ते 14 सप्टेंबर या कालावधीत 34 जणांचा जीव गेला. तसेच लहान-मोठ्या अशा 414 दुधाळ जनावरांचा तसेच 3430 कोंबड्या आणि मोठ्या 18 जनावरांचा मृत्यू झाला.

मराठवाडा: अतिवृष्टीमुळे 14 दिवसात 34 जणांचा मृत्यू, धरणांतून विसर्ग सुरूच, अनेक गावांशी संपर्क तुटला
| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 12:48 PM
Share

औरंगाबाद: बदललेल्या हवामानामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा मुक्काम वाढला आहे. परभणी, नांदेड, बीडमध्ये (Parbhani, Nanded, Beed) पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे अनेक जलसिंचन प्रकल्प पूर्णपणे भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परभणी, हिंगोली, बीड, नांदेडमधील महत्त्वाची धरणे भरली असून त्यातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसराला पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. मात्र गुलाब चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील दोन दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange alert for some districts in Marathwada) जारी करण्यात आल्याने पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

परभणीः येलदरी धरणातून किती विसर्ग?

जिल्ह्यातील येलदरी धरण आणि निम्न दुधना प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने रविवारी सायंकाळी धरणांचे गेट उघडण्यात आले. यातून 17 हजार 328 क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. तसेच या भागातील पिंपळदर, चारठाणा मंडळात रविवारी अतिवृष्टी झाली.

माजलगाव व मांजरा धरणाची काय स्थिती?

धुँवाधार पावसामुळे रविवारी माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे सिंदफणा नदीपात्रात 62 हजार 517 क्युसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला. मांजरा धरणातही पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडून 35 हजार 968 क्युसेक वेगाने मांजरा नदीत विसर्ग करण्यात आला.

नांदेडः विष्णुपुरी धरणाचे ६ दरवाजे उघडले

मुसळधार पावसामुळे विष्णुपुरी धरणाचेही 6 दरवाजे रविवारी उघडण्यात येऊन नदीपात्रात पाण्यासा विसर्ग सुरु करण्यात आला. सततच्या पावसामुळे छत्रपती चौक ते निळ्या फाट्याची दयनीय अवस्था झाली.

अतिवृष्टीमुळे 14 दिवसांत 34 जणांचा मृत्यू

दरम्यान, सप्टेंबर महिन्यातील मुसळधार पावसाचा मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला. एक ते 14 सप्टेंबर या कालावधीत 34 जणांचा जीव गेला. तसेच लहान-मोठ्या अशा 414 दुधाळ जनावरांचा तसेच 3430 कोंबड्या आणि मोठ्या 18 जनावरांचा मृत्यू झाला. सगळ्यात जास्त मनुष्यहानी नांदेड जिल्ह्यात झाली. अतिवृष्टीत मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती, उस्मानाबादचे निवासी जिल्हाधिकारी, शिवकुमार स्वामी यांनी दिली. (Heavy rains flooded dams in Marathwada, cut off communication with many villages, Aurangabad, Maharashtra)

इतर बातम्या- 

Mumbai Rain : मुंबईत 23 तारखेपर्यंत पावसाचा जोर, मुसळधार पावसाची शक्यता, सखल भागात पाणी साचण्याचा अंदाज

Solapur Rain | सोलापुरात बोरी आणि हरणा नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला 

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.