AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरत्न जडवलेली सोन्याची बांगडी महिलेने पळवली, चोरीची चपळाई एवढी की रात्री हिशेब करतानाच….

औरंगाबादः शहरातील एका स्टोअरमधील नऊ रत्ने जडवलेली सोन्याची बांगडी महिलेने मोठ्या शिताफीने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्याच्या बहाण्याने ही महिला स्टोअरमध्ये आली आणि कर्चमाऱ्याचे लक्ष नसताना हातचलाखी करत नवरत्न जडवलेली बांगडी पर्सखाली झाकली. पैसे आणण्याचा बहाण करत स्टोअरच्या बाहेर पडली आणि पुन्हा आलीच नाही. एवढ्या वेळातच मोठ्या चपळाईने तिने ही […]

नवरत्न जडवलेली सोन्याची बांगडी महिलेने पळवली, चोरीची चपळाई एवढी की रात्री हिशेब करतानाच....
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी कैद
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 12:06 PM
Share

औरंगाबादः शहरातील एका स्टोअरमधील नऊ रत्ने जडवलेली सोन्याची बांगडी महिलेने मोठ्या शिताफीने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्याच्या बहाण्याने ही महिला स्टोअरमध्ये आली आणि कर्चमाऱ्याचे लक्ष नसताना हातचलाखी करत नवरत्न जडवलेली बांगडी पर्सखाली झाकली. पैसे आणण्याचा बहाण करत स्टोअरच्या बाहेर पडली आणि पुन्हा आलीच नाही. एवढ्या वेळातच मोठ्या चपळाईने तिने ही कृती केल्याने स्टोअरमधील कर्मचारीही हैराण झाले. नवरत्न जडवलेली ही सोन्याची बांगडी सुमारे 24 ग्रॅम वजनाची होती. तिची किंमत 1 लाख 2 हजार रुपये एवढी होती.

काय घडलं नेमकं?

शहरातील मोंढा नाका येथील मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ज्वेलरी दालनात शनिवारी संध्याकाळी 6.20 मिनिटांनी ही घटना घडली. नवीन वर्षानिमित्त दुकानात सर्व ग्राहकांना केक कापण्यासाठी बोलावण्यात आले. मात्र बुरखाधारी महिलेने नकार देत घाई असल्याचे सांगत लवकर सोन्याच्या बांगड्या दाखवण्याचा आग्रहक केला. मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह अशोक गायकवाड यांनी दागिने दाखवण्यास सुरुवात केली. अशोक इतर दागिन्यांकडे वळताच महिलेने समोरील काउंटरवरील एक बांगडी पर्सखाली लपवली. त्यानंतरही बराच वेळ तिने इतर दागिने पाहिले. एक राणीहार पाहिल्यानंतर तिने ‘बाहेर गाडीतील चालकाला घरून पैसे आणायला सांगून येते,’ असे हिंदीत म्हणून बाहेर पडली. मात्र त्यानंतर ती दुकानात परत आलीच नाही.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद, संशयित महिला ताब्यात

रात्री साडेदहा वाजता दिवसभराचा हिशेब करताना मात्र अशोक यांना एक सोन्याची बांगडी कमी दिसली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा 6.21 वाजता बुरखाधारी महिलेने पर्सखाली बांगडी लपवल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना ही बाब कळवली. पोलिसांना माहिती देण्यात आली. रविवारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रेकॉर्डवरील गुन्हेगार महिलेला संशयित म्हणून ताब्यात घेतले. सदर महिलेला यापूर्वी सिटी चौक पोलिसांनी अटक केली होती. जिन्सी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला आहे.

इतर बातम्या-

Sindhudurg | स्कूल बस मालवण समुद्रात भरतीच्या पाण्यात अडकली, स्थानिकांच्या मदतीने आणली किनाऱ्यावर

World Famous Hindu Temples | जगाच्या काना कोपऱ्यात असलेली डोळ्यांची पारणं फेडणारी प्रसिद्ध मंदिरे

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.