औरंगाबादः अंगुरी बाग रोडवरील धोकादायक इमारत पाडली, अनेकदा इशारा देऊनही अंमलबजावणी नाही

औरंगाबाद:  महानगरपालिकेच्या  (Aurangabad Municipal corporation)अतिक्रमण हटाव पथकाने शुक्रवारी दिवाण देवडी-अंगुरीबाग (Anguribagh) रस्त्यावरील धोकादायक इमारत जमीनदोस्त केली. शुक्रवारी सकाळी साडे अकरा ते दीड वाजेच्या सुमारास ही इमारत पाडण्यात आली. संबंधित इमारतीच्या मलकाला (Building owner)  पालिकेने वारंवार नोटीस बजावल्यानंतरही त्यावर योग्य ती अंमलबजावणी मालकाकडून झाली नव्हती. त्यामुळे महापालिकेतर्फे ही कारवाई करण्यात आली.  तसेच चिकलठाणा, सिडको रोडवरील 6 टपऱ्या […]

औरंगाबादः अंगुरी बाग रोडवरील धोकादायक इमारत पाडली, अनेकदा इशारा देऊनही अंमलबजावणी नाही
अतिक्रमित इमारत, टपऱ्या व झोपड्या महापालिकेकडून जमीनदोस्त
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 1:34 PM

औरंगाबाद:  महानगरपालिकेच्या  (Aurangabad Municipal corporation)अतिक्रमण हटाव पथकाने शुक्रवारी दिवाण देवडी-अंगुरीबाग (Anguribagh) रस्त्यावरील धोकादायक इमारत जमीनदोस्त केली. शुक्रवारी सकाळी साडे अकरा ते दीड वाजेच्या सुमारास ही इमारत पाडण्यात आली. संबंधित इमारतीच्या मलकाला (Building owner)  पालिकेने वारंवार नोटीस बजावल्यानंतरही त्यावर योग्य ती अंमलबजावणी मालकाकडून झाली नव्हती. त्यामुळे महापालिकेतर्फे ही कारवाई करण्यात आली.  तसेच चिकलठाणा, सिडको रोडवरील 6 टपऱ्या व 7 झोपड्या हटवण्यात आल्या.

मालकाला अनेकदा इशारा

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींना नोटिसा देण्यात येतात. त्यानुसार 2020 मध्ये 40 बाय 30 जागेतील धोकादायक इमारतीचा पंचनामा करून नोटीस देण्यात आली होती. इतर सर्व धोकादायक भाग काढून घेण्यात आला होता. परंतु अशोक कोंडे यांनी मनपाच्या नोटिसीला न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, 9 सप्टेंबर रोजी न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळला. तरीही कोंडे यांनी धोकादायक इमारत स्वतःहून पाडली नाही. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंतर्गत त्यांना नोटीस देण्यात आली होती. याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. पावसामुळे ही इमारत चार ते पाच महिन्यांत खूपच जीर्ण झाली होती. त्याला लोखंडी अँगल, विटा, सिमेंटमध्ये बांधकाम करण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांना २ ऑक्टोबर रोजी मनपातर्फे महानगरपालिका अधिनियमाचे कलम 478 (2) अन्वये पुन्हा नोटीस बजावण्यात आली. तरी देखील शनिवार, रविवार व इतर शासकीय सुट्यांचा फायदा घेत अनधिकृत बांधकाम सुरू होते. दरम्यान, सदर नोटिसीला पुन्हा न्यायालयात विनंती अर्ज नुसार दावा केला होता. परंतु महानगरपालिकेच्या वतीने अॅड. विलास कदम यांनी प्रकरणाची सर्व माहिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली व वेळोवेळी केलेल्या पंचनाम्यांचे फोटो न्यायालयात सादर केले. दोन्ही पक्षकारांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने 20 ऑक्टोबर रोजी विनंती अर्ज फेटाळला. त्यानंतर मनपा विधी विभागप्रमुख व उपायुक्त अपर्णा थेटे यांचा अभिप्राय घेण्यात आला व शुक्रवारी इमारत पाडण्यात आली.

6 टपऱ्या व 7 झोपड्याही जमीनदोस्त

चिकलठाणा ते सिडको बसस्टँड या रस्त्यावरील एकूण सहा टपऱ्या व 7 झोपड्या काढण्यात आल्या. ही कारवाई प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, राचतवार, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, पी.व्ही. गवळी, मजहर अली, सुरासे यांनी केली. दिवान देवडी येथील धोकादायक इमारत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केली.

100 कोटी लसीकरणाबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

देशभरात कोरोना लसींचे 100 कोटी डोस पूर्ण केल्याबद्दल लसीकरणातील कर्मचाऱ्यांचा 21 ऑक्टोबर रोजी एन-8 येथील मनपा आरोग्य केंद्रात सत्कार करण्यात आला.  भाजप सिडको -राजाबाजार मंडळ व भाजप सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष विलास कोरडे यांच्यातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला.  कार्यक्रमात  पंतप्रधान मोदींची 12 फुटी प्रतिमा तयार करण्यात आली. आमदार अतुल सावे व शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्या मार्गद‌र्शनाखाली गणेश नावंदर, अरुण पालवे, नितीन खरात, सुभाष लोखंडे, पाटील देवानंद, अमय देशमुख, संगीता राऊत, लक्ष्मी गायकवाड, सरिता घोडतुर, हर्षल चिंचोलकर, प्रदीप ठाकरे, चंद्रमुनी जायभये, राऊत कैलास, राऊत अरुण, श्याम बांगड, परमेश्वर वाडेकर, अतिक पठाण आदींची उपस्थिती होती. आरोग्य कर्मचारी डॉ. समी बुशरा, डॉ. कल्पना राठोड, मनीषा पाटील, देवगना शेळके, अनुसया सोनटक्के, रुहीन फारुकी, वर्षा लाळगे, सुरेखा बत्तीशे, समिद्रा सोनवणे, अलका भिवसणे, उज्ज्वला तोडकरी, स्वाती भुळवणे, प्रदीप जोशी, युवराज लांडगे, संतोष केंद्रे, नरेेश दसरे, प्रल्हाद करडे यांचा सत्कार करण्यात आला. भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

इतर बातम्या-

तोंडोळी दरोडाः म्होरक्यासह एकाला बेड्या, 5 अद्याप फरार, आरोपींकडे मोबाइल नसल्याने लोकेशन शोधण्याचे आव्हान!

जे करायचं ते वेळेवर करू, औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरावरून किरीन रिजिजूंचे संकेत, अनेकांच्या भुवया उंचावल्या

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.