औरंगबादमधील रांजणगावातल्या किराणा दुकानात टोळक्याचा धुडगूस, 10 ते 12 दुचाकी फोडल्या, दोन महिला जखमी

या टोळीने किराणा दुकानातील साहित्य रस्त्यावर फेकत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी घरातील पुरुषमंडळी दुकानात नसल्याने या दोघींना आरडाओरड सुरु केली. शेजारी मदतीला धावले, मात्र गुंडांनी त्यांनाही आरेरावी केली.

औरंगबादमधील रांजणगावातल्या किराणा दुकानात टोळक्याचा धुडगूस, 10 ते 12 दुचाकी फोडल्या, दोन महिला जखमी
रांजणगावात किराणा दुकानात टोळक्याचा धुडगूस

औरंगाबादः वाळूज परिसरातील रांजणगावात (Ranjangaon) एका टोळक्याने धुमाकूळ घालत दहा ते बारा दुचाकी फोडल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. रांजणगावातील आसारामबापू नगरमध्ये ही घटना घडली. आधीच्या भांडणावरून टोळक्याने किराणा दुकानात धुडगूस घातला. तसेच बाहेरील दुचाकींची तोडफोड केली. या मारहाणीच्या घटनेत एक महिला व तरुणी अशा दोघी जखमी झाल्या. या प्रकरणी वाळूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय आहे वाद?

रांजणगावातील आसाराम बापू नगरात शनिवारी संध्याकाळी करण जैन हा मद्यमप्राशन करून गोंधळ घालत होता. त्यामुळे शेजारी राहणारे राम बाली दामोदर यांनी त्याच समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद वाढल्याने राम दामोदर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर रविवारी सायंकाळी करण दहा ते पंधरा साथीदारांना सोबत घेऊन राम यांच्या किराणा दुकानात गेला. दुकानातील दामोदर कुटुंबातील महिलांशी वाद घालत त्यांना मारहाण केली.

किराणा दुकानाची नासधूस

नंतर या टोळीने किराणा दुकानातील साहित्य रस्त्यावर फेकत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी घरातील पुरुषमंडळी दुकानात नसल्याने या दोघींना आरडाओरड सुरु केली. शेजारी मदतीला धावले, मात्र गुंडांनी त्यांनाही आरेरावी केली. टोळक्याने लाठ्या-काठ्यांनी गल्लीतील दुचाकींची तोडफोड केली. किमान तासभर या ठिकाणी असा गोंधळ सुरु होता. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती.

इतर बातम्या-

Dr. Ambedkar: महामानवाच्या अस्थी मराठवाड्यात फक्त एकाच ठिकाणी, औरंगाबादच्या भाऊसाहेब मोरे कुटुंबियांकडे लाखमोलाचा वारसा!

यळकोट यळकोट जय मल्हार! खंडोबाच्या नवरात्राला उत्साहात सुरुवात, साताऱ्यात पहिल्याच दिवशी 12 हजारांवर भाविकांनी घेतले दर्शन


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI