औरंगाबादः इंडिगो विमानांचे सकाळऐवजी संध्याकाळी उड्डाण, धुक्यांमुळे वेळ बदलण्याचा निर्णय

औरंगाबाद: इंडिगोची विमाने (Indigo Flight)  आतापर्यंत शहरातून सकाळच्या सत्रात उड्डाण घेत होती. मात्र 31 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान ही विमाने सायंकाळच्या सत्रात उड्डाणे घेतील, असे विमानतळ प्रशासनाकडून (Aurangabad Airport) सांगण्यात आले आहे. औरंगाबाद शहरात हिवाळ्यात सकाळच्या वेळी शहरात धुक्याचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे या धुक्याचा अंदाज घेऊन 30 नोव्हेंबरनंतरचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असेही विमान […]

औरंगाबादः इंडिगो विमानांचे सकाळऐवजी संध्याकाळी उड्डाण, धुक्यांमुळे वेळ बदलण्याचा निर्णय
औरंगाबाद विमानतळापासून इंडिगोची विमाने सकाळऐवजी संध्याकाळी उड्डाण घेतील.
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 12:25 PM

औरंगाबाद: इंडिगोची विमाने (Indigo Flight)  आतापर्यंत शहरातून सकाळच्या सत्रात उड्डाण घेत होती. मात्र 31 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान ही विमाने सायंकाळच्या सत्रात उड्डाणे घेतील, असे विमानतळ प्रशासनाकडून (Aurangabad Airport) सांगण्यात आले आहे. औरंगाबाद शहरात हिवाळ्यात सकाळच्या वेळी शहरात धुक्याचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे या धुक्याचा अंदाज घेऊन 30 नोव्हेंबरनंतरचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असेही विमान प्राधिकरणाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

विमानाची बदललेली वेळ काय?

पर्यटनाचे प्रमाण वाढवणे आणि उद्योगाच्या दृष्टीने विमानसेवा अधिकाधिक सुरळीत असणे गरजेचे आहे. आतापर्यंत दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्या विमानाची वेळ सायंकाळी 7 वाजता करण्यात आली आहे. या विमानाची आसन क्षमता 180 प्रवाशांची आहे, तर हैदराबादला सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी जाणारे विमान आता सायंकाळी 5 वाजता उड्डाण घेईल. याची प्रवासी क्षमता 78 आहे. दिल्लीसाठी मोठे विमान देण्यात आले आहे, ज्यामध्ये 232 प्रवासी बसू शकतील. हे विमान सध्या दुपारी अडीच वाजता उड्डाण घेत होते, ते आता सायंकाळी 7.30 वाजता जाईल, अशी माहिती इंडिगो कंपनीच्या वतीने देण्यात आली.

सध्या एक महिन्यासाठी बदल

हिवाळ्यात धुक्यामुळे उड्डाणात अडचणी येतात. त्यामुळे वेळेत बदल करण्यात आला. महिनाभरातील परिस्थिती पाहिल्यानंतर डिसेंबर आणि जानेवारीतील वेळा ठरवल्या जातील. प्रवाशांच्या सुविधेसाठी हा बदल सकारात्मक आहे, असे औरंगाबाद पर्यटन विकास फोरमच्या सिव्हिल एव्हिएशन समितीचे अध्यक्ष सुनीत कोठारी म्हणाले.

मेल्ट्रॉनमध्ये 18 ऑक्टोबरुपासून लसीकरण केंद्र

कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी औरंगाबाद शहरातील मेल्ट्रॉन रुग्णालयात सोमवारपासून लसीकरण केंद्र सुरु केल्याची माहिती मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. शहरात कोरोना लसीकरण मोहीम सुरु असली तरी काही वसाहतींमध्ये नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आरोग्य विभागाकडून कवच कुंडल मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 29 हजार 800 नागरिकांचे 8 दिवसात लसीकरण झाले. नवरात्रोत्सवामुळे नागरिकांनी दुसरा डोस घेण्याचे टाळले होते. परंतु आता पुन्हा लसीकरणाने वेग घेतला आहे. महापालिकेने 71 लसीकरण केंद्र सुरु केली आहेत. ज्या भागात लसीकरणाला प्रतिसाद मिळाला नाही, त्या भागात जनजागृती करून नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्याहित केले जात आहे. मेल्ट्रॉन कोविड सेंटरमद्ये सुमारे 9 हजार कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले.

इतर बातम्या-

PHOTO: हत्याराचा शोध घेण्यासाठी औरंगाबाद पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न, दोन दिवस, दोन रात्र.. विहिरीतील गाळ उपसा सुरूच..

औरंगाबाद: व्यावसायिक मीटरची किंमत 1 लाख रुपये? लवकरच अवैध कनेक्शनची तपासणी होणार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.