PHOTO: हत्याराचा शोध घेण्यासाठी औरंगाबाद पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न, दोन दिवस, दोन रात्र.. विहिरीतील गाळ उपसा सुरूच..

1/5
औरंगाबादमधील मौलाना आझाद महाविद्यालयातील प्रोफेसर डॉ. राजन शिंदे यांचा अत्यंत निर्घृणपणे खून गेल्या आठवड्यात झाला. 11 ऑक्टोबर रोजी पहाटे हा खून झाल्यावर औरंगाबादसह राज्यभरात खळबळ माजली. शिंदे यांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली, मात्र ही हत्या कुणी केली, याचा तपास अद्यापही सुरुच आहे. शिंदे यांच्या घराजवळीलच विहिरीत खुनासाठी वापरलेली हत्यारं टाकल्याचा पोलिसांना दाट संशय आहे, त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या विहिरीतील गाळ व पाणी उपसण्याचे काम सुरु आहे.

2/5
डॉ. शिंदे यांच्या घराजवळील विहिरीतील पाणी उपसा शनिवार 16 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजल्यापासून सुरु करण्यात आला होता. महापालिकेच्या मदतीने पाच एचपीचे दोन आणि दोन एचपीचे दोन अशा चार पंपांद्वारे पाणी उपसण्याचे काम सकाळपर्यंत सुरु होते. यात आणखी एक मोटार वाढवण्यात आली आहे. यामुळे लवकरच पाणी उपसा होईल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यासाठी आठ ते दहा कर्मचारी काम करत असून संपूर्ण पाणी उपसल्याशिवाय शस्त्र सापडणार की नाही याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

3/5
पोस्टमॉर्टेमच्या अहवालात खून किती क्रूरपणे केलाय, हे उघड झाले आहे. मारेकऱ्याने दोन हत्यारांचा वापर केला. त्यातील एक हातोडा किंवा लोखंडी रॉडसारखे होते. त्यातील लोखंडी रॉडचा एक तडाखा डोक्याच्या मागील बाजूला केला, तर कपाळावर तीन घाव घातले. हा तडाखा व घाव शक्तीनिशी डॉ. शिंदेंना प्रतिकार करणे कठीण गेले असावे. त्यानंतर मारेकऱ्याने धारदार हत्याराने त्यांचा डावा कान तीन चतुर्थांश कापला. मग गळा मणक्यापर्यंत म्हणजे दीड ते पावणेदोन इंच खोलवर चिरला. त्यामुळे डॉ. राजन यांना ओरडणेही शक्य झाले नसावे.

4/5
 सूत्रांच्या माहितीनुसार हातोड्याच्या फटक्याने अर्धवट बेशुद्धावस्थेत गेलेल्या डॉ. राजन यांच्या छातीवर मारेकरी काही मिनिटे बसला. छातीवर बसूनच त्याने त्यांच्या दोन भुवयांच्या अगदी अचूक मध्यभागी धारदार हत्याराने एक बारीक आकाराचा वार केला. ती जखम ठळकपणे दिसेल अशी काळजी मारेकऱ्याने घेतली असावी. डॉ. राजन शिंदे यांच्या निकटवर्तीयाने, तो हिटलरसारखे वागत होता, त्यामुळे एकदाचे त्याला संपवले, अशी कबुली दिल्याची माहिती आहे. परंतु फक्त या कारणामुळे डॉ. शिंदे यांचा एवढा निर्घृण खून कसा केला, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्यामुळे पोलीसही या जबाबावर समाधानी नाहीत.

5/5
औरंगाबादमध्येच 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या आणखी एका क्रूर हत्येने खळबळ उडाली आहे. या हत्येतदेखील पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने खून करून ती विहिरीत फेकून दिली. गंगापूर तालुक्यात ही घटना घडली. हत्येनंतर पतीने स्वतः विहिरीत आत्महत्या केली. या तपासासाठीदेखील पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.  चंपालाल तान्हासिंग बिघोत व गंगाबाई चंपालाल बिघोत अशी मृतांची नावे आहेत. या खुनाचे व आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI