औरंगाबादनंतर जालन्यात जलाक्रोश, पाणी प्रश्नासाठी मामा चौकात भव्य मोर्चा, देवेंद्र फडणवीस इथेही मैदानात !

| Updated on: Jun 15, 2022 | 2:05 PM

आजच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि जालना भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्याशी टीव्ही 9 प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ' जालन्यात 12 दिवस पाणी येत नाही. आमच्या सरकारमध्ये आम्ही वितरण व्यवस्थेसाठी निधी मंजूर केला. आम्ही लोकांचा चेहरा बनून हा मोर्चा काढला आहे.

औरंगाबादनंतर जालन्यात जलाक्रोश, पाणी प्रश्नासाठी मामा चौकात भव्य मोर्चा, देवेंद्र फडणवीस इथेही मैदानात !
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जालना | औरंगाबादनंतर जालन्यात भाजपतर्फे जलाक्रोश मोर्चा (Jalakrosh Morcha) काढण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसच्या सत्तेखालील नगरपालिकेने अनेक वर्षांपासून शहरातील पाण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष केलं आहे. शहरातील प्रमुख दोन जलाशयांमध्ये अनेक भागांत दहा ते पंधरा दिवसाआड पाणी येतं. मात्र शहरवासियांना किमान आठ दिवसातून दोनदा पाणी मिळावं, या मागणीसाठी भाजपतर्फे हा जलाक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. जालन्यातील या मोर्चाची जय्यत तयारी भाजपतर्फे कऱण्यात आली होता. आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या उपस्थितीत भाजपातर्फे हा मोर्चा काढण्यात येत आहे. जालन्यातल्या मामा चौकात यानिमित्त आज सकाळपासूनच भाजप कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती. सकाळी 11 वाजेनंतर शेकडो कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी या मोर्चात सहभाग नोंदवत पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.

रिकाम्या कळशा, हंडे घेऊन माहिला

जालन्यातील या जलाक्रोश मोर्चात असंख्य महिला पाणी प्रश्नावरावर आवाज उठवण्यासाठी एकत्र आल्या. या महिलांच्या डोक्यावर रिकाम्या कळश्या आणि रिकामे माठ होते.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाणीप्रश्न पेटला

जालना शहरात आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी प्रश्न पेटला आहे. शहरातील दोन्ही जलाशयांमध्ये पाणी उपलब्ध असतानाही पंधरा दिवसा आड पाणी येतं. तसेच अंतर्गत जलवाहिनी उशीराने होत आहे. पालिका निवडणुकांच्या तोंडावर हाच मुद्दा उचलून धरण्यात आला आहे. भाजपचा जुना मित्र असेलल्या शिवसेनेने पालिकेत युती तोडली आहे. त्यामुळे भाजपला एकट्याला लढावे लागणार आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या पालिकेच्या कारभाराविरोधात भाजपने रणशिंग फुंकले आहे. त्यासाठी पाण्याचा प्रश्न घेऊन जालनेकरांचा आक्रोश मांडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

आजच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि जालना भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्याशी टीव्ही 9 प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘ जालन्यात 12 दिवस पाणी येत नाही. आमच्या सरकारमध्ये आम्ही वितरण व्यवस्थेसाठी निधी मंजूर केला. आम्ही लोकांचा चेहरा बनून हा मोर्चा काढला आहे. कुणीतरी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा लागतो. त्यामुळे आम्ही जालनेकरांचा आवाज बनून पुढे आलो आहोत, पालिका प्रशासनाला आमचा आक्रोश ऐकावाच लागेल…