ज्या नामकरणावरुन राडा झाला त्यावर साहित्यिक स्पष्टच बोलले, क्षुद्र म्हणत कुणाचे काढले वाभाडे? नवा वाद पेटणार?

हडप्पा आणि मोहंजोदाडो संस्कृती जशी नष्ट झाली आहे तशी आपल्या संस्कृतीच्या अंताची सुरुवात झाली असल्याची भीतीही साहित्यिकांनी व्यक्त केली आहे.

ज्या नामकरणावरुन राडा झाला त्यावर साहित्यिक स्पष्टच बोलले, क्षुद्र म्हणत कुणाचे काढले वाभाडे? नवा वाद पेटणार?
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 6:57 PM

पुणे : मराठी साहित्यविश्वातील ज्येष्ठ लेखक आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरीकार भालचंद्र नेमाडे ज्या प्रमाणे त्यांच्या साहित्यविश्वामुळे चर्चेत असतात. त्याच प्रमाणे त्यांच्या वक्तव्यामुळेही ते अनेकदा चर्चेत आले आहेत. लोकांना पटो अथवा न पटो त्यांनी आपली भूमिका नेहमीच मांडली आहे. कधी साहित्य संमेलनवरून त्यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाले आहेत तर कधी लोकप्रतिनिधींवरूनही त्यांची वक्तव्य वादग्रस्त ठरली आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर खोक्यावरून होणाऱ्या आरोपांबद्दलही त्यांनी आपले मत व्यक्त केले होते.

खोक्यांची भाषा करणाऱ्या पुढाऱ्यांना हरामखोर म्हणत आपण हरामखोर लोकांना निवडून देतो असं वक्तव्य त्यांन केले होते.

त्यावरूनही जोरदार वाद निर्माण झाला होता. तर त्याच शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या नेमाडे शैलीत त्यांनी जोरदार टीका केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचे नामांतर केल्यानंतर त्यावरही भालचंद्र नेमाडे यांनी टीका केली होती. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलणारे लोकं क्षुद्र आहेत.

या शहरांची नावं बदल्यामुळे त्यातून काहीच साध्य होणार नाही असं रोखठोक मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. हा वाद निर्माण करण्यापेक्षा औरंगाबाद शहराला पाणी द्या, तिथं चांगली झाडे लावा असेही त्यांनी यावेळी सुनावले.

भालचंद्र नेमाडे यांनी शहरांची नावं ज्या कुणी बदलली आहेत. त्यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, आपली संस्कृतीही आता हळूहळू लोप पावत चालली आहे.

हडप्पा आणि मोहंजोदाडो संस्कृती जशी नष्ट झाली आहे तशी आपल्या संस्कृतीच्या अंताची सुरुवात झाली असल्याची भीतीही भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली.

तर यावेळी त्यांनी भारतातील लोकशाहीही धोक्यात आली असून सत्य बोलणाऱ्या माणसांना पोलीस संरक्षणात फिरावे लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.