“मुख्यमंत्री सध्या रजेवर, तर माणुसकी असेल तर फडणवीस यांनी बारसूत जावं”; विरोधकांनी आंदोलनाला सरकारला जबाबदार धरलं

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बंदुका रोखल्या आहेत. जमिनीचे मालक असणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात हे सरकार दहशतवादी असल्यासारखे वागत असल्याचा घणाघातही खासदार संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे.

मुख्यमंत्री सध्या रजेवर, तर माणुसकी असेल तर फडणवीस यांनी बारसूत जावं; विरोधकांनी आंदोलनाला सरकारला जबाबदार धरलं
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 6:20 PM

मुंबई : बारसूतील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात पुन्हा एकदा आंदोलन छेडण्यात आले आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचे सर्वेक्षण करण्यात येत असून त्याविरोधात आता हजारो शेतकऱ्यांना आंदोलन छेडल्यामुळे हे प्रकरण पेटले आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात आहे, तर दुसरीकडे रिफायनरी प्रकल्प कोकणाचा विकास करण्याच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे. त्यावरून आता खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली आहे.

बारसू येथील प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याने हे प्रकरण प्रचंड तापले आहे.

तर माध्यम प्रतिनिधींनाही पोलिसांनी हटवल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यावरून सरकारवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

जे शेतकरी आपल्या शेतीसाठी आंदोलन करत आहेत, त्या शेतकऱ्यांविरोधात सरकारवर दडपशाही पद्धतीने वागत आहेत. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बंदुका रोखल्या आहेत. जमिनीचे मालक असणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात हे सरकार दहशतवादी असल्यासारखे वागत असल्याचा घणाघातही खासदार संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे.

एकीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री रजेवर असल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्र्यांकडे थोडी तरी माणुसकी असेल तर त्यांनी एकदा बारसूमध्ये जाऊन शेतकऱ्यांबरोबर संवाद साधावा अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

बारसू आंदोलनावरून सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल चढविला आहे. शेतकऱ्यांबरोबर हे सरकार दहसशतवाद्यांप्रमाणे वागत असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.

खासदार संजय राऊत यांनी या सराकरला धारेवर धरत शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून त्यांनी सरकार आपली जबाबदारी झटकत आहे अशीही टीका त्यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.