AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khavdya Dongar : खवड्या डोंगराबाबतची धक्कादायक माहिती समोर, कुणालच्या आधीही… किती तरुणांनी दिला जीव? धक्कादायक माहिती समोर

छत्रपती संभाजीनगरजवळील खवड्या डोंगर धोकादायक 'सुसाईड पॉइंट' बनला आहे. चांदगुडे कुटुंबाच्या हृदयद्रावक घटनेनंतर, २१६ फुटांचा हा कडा सुरक्षा उपाययोजनांअभावी चर्चेत आला आहे. आतापर्यंत १३ जणांनी येथे जीव गमावला आहे. आणखी दुर्घटना टाळण्यासाठी, प्रवेशावर बंदी घालून सुरक्षा वाढवण्याची तातडीची मागणी होत आहे.

Khavdya Dongar : खवड्या डोंगराबाबतची धक्कादायक माहिती समोर, कुणालच्या आधीही... किती तरुणांनी दिला जीव? धक्कादायक माहिती समोर
Khavdya DongarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 22, 2026 | 3:04 PM
Share

छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. कुणाल चांदगुडे या तरुणाने खवड्या डोंगरावर जाऊन टोकाचं पाऊल उचललं. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे पुढे सरसावले आणि त्यांचाही डोंगरावरून पडून मृत्यू झाला. एका क्षणात अख्खं कुटंब उद्ध्वस्त झालं. सोन्यासारखा संसार धुळीला मिळाला. या घटनेमुळे अख्खं छत्रपती संभाजीनगर सुन्न झालं आहे. अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे. खवड्या डोंगरावरून जीव देण्याची ही पहिलीच घटना नाहीये. या पूर्वीही अनेक घटना घडल्या आहेत. हा डोंगर आता सुसाईड पॉइंट ठरत असल्याने येथील स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

छत्रपती संभाजीनगरला तिसगाव परिसरात धुळे-सोलापूर महामार्गालगत हा डोंगर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत असल्याने या डोंगराचा सर्व भाग बदलून गेला आहे. बराच डोंगर कापण्यात आल्याने आता या ठिकाणी 246 फुटांचा कडा उभा आहे. म्हणजे एखादा सुळका असावा असा हा डोंगर आहे. शिवाय या डोंगराला कोणताच उतार नाही, त्यामुळे तो धोकादायक झाला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. कोणताही कठडा नाही, जाळ्या लावून प्रवेशास मनाई करण्यात आलेली नाही. तसेच कोणताही फलक लावून प्रवेश निषिद्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे या डोंगरावर कोणीही कधीही सहज जाऊ शकतो. त्यामुळे दुर्घटना होण्याच्या घटना घडत आहेत.

13 जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, खवड्या डोंगरावरून आतापर्यंत 13 जणांनी उडी मारून जीवन संपवलं आहे. तर या ठिकाणी एक खुनाची घटना झाल्याचंही समोर आलं आहे. तर गतवर्षी एकाने त्याच्या बहिणीला कड्यावरून ढकलून दिल्याची घटनाही घडली होती. मात्र, या घटना अधूनमधून होत असल्याने हा डोंगर फार चर्चेत नव्हता. पण काल चांदगुडे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने खवड्या डोंगर चर्चेत आला आहे. आता या ठिकाणी प्रवेशास मनाई करण्याची आणि या परिसरात सुरक्षा ठेवण्याची मागणी होत आहे.

कड्यावरून पडण्याची भीती

या डोंगरावर गेल्यानंतर कड्यावर कोणीही जाऊ शकतो. कडा अत्यंत उंच असल्याने त्यावरून पडण्याची शक्यता अधिक आहे. हवेच्या झोक्याने एखाद्याचा तोल जाऊ शकतो, किंवा कड्यावरून खाली पाहिल्यानंतरही एखाद्याचा तोल जाऊ शकतो इतका हा धोकादायक परिसर असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या कड्या भोवती संरक्षक जाळ्यांचं जाळं पसरलं तरच कुणालाही धोका होणार नाही, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?