धक्कादायक! शेतवस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ, सामुहिक बलात्कार, औरंगाबाद जिल्ह्यातील तोंडाळीतील घटना

जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तोंडाळी गावातील शेतवस्तीवर घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे अवघ्या गावात दहशत पसरली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास केला जात आहे.

धक्कादायक! शेतवस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ, सामुहिक बलात्कार, औरंगाबाद जिल्ह्यातील तोंडाळीतील घटना
तांदोळी गावातील घटनास्थळी पोलीस पोहोचले असून तपास सुरु आहे.

औरंगाबाद: जिल्ह्यातील तोंडाळी गावातील शेतवस्तीवर बुधवारी मध्यरात्रीतून दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी या वस्तीची केवळ लूटच केली नाही तर दोन महिलांवर बलात्कार केल्याचीही माहिती हाती आली आहे. या घटनेमुळे औरंगाबादमधील पैठण तालुक्यासह संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याला (Robbery in Tandoli) हादरा बसला आहे.

महिलांवर सामुहिक बलात्कार

जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तोंडाळी गावातील शेतवस्तीवर घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे अवघ्या गावात दहशत पसरली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दरोडेखोरांनी येथील वस्तीची लूट केली. तसेच येथील दोन महिलांवर सामुहिक बलात्कारदेखील केला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान या दोन्ही महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

लासूरः घराला आग लागून शेतकऱ्याचे नुकसान

औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर स्टेशन जवळील अन्य एका घटनेत आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. जुने देवळी परिसरातील राहणाऱ्या एका कुटुंबाच्या पत्र्याचे शेड असलेले कुडाच्या घराला अचानक आग लागल्याने घर जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. देवळी महंमदपूर येथील रहिवासी शेख रऊफ शेख पापाभाई सुलतानाबाद शिवारातील शेतवस्तीवर पत्र्याचे व कुडाच्या घरात राहतात. मंगळवारी दुपारी ते आणि त्यांची पत्नी घराजवळच असलेल्या शेतात कापूस वेचणीसाठी गेले होते व घराबाहेर लहान असलेल्या मुली खेळत असताना तीन वाजेच्या दरम्यान घरातून धुराचे लोट बघून त्यांनी घराकडे धाव घेतली असता आजूबाजूचे शेतकरीही मदतीला धावले. पण दुर्दैवाने तोपर्यंत सर्व घर जळून खाक झाले होते. घरात असलेला कापूस, कपडेलत्ते व धान्य असे सगळेच आगीत भस्मसात झाल्याने शेख कुटुंब उघड्यावर पडले आहे. या आगीत शेख कुटुंबाचे जवळजवळ दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, झालेल्या जळिताची पाहणी करण्यास कुणीही शासकीय अधिकारी घटनास्थळी आलेले नसल्याचे समजते.

इतर बातम्या-

औरंगाबाद-जालन्यात घरफोड्या करणारे दोघे अटकेत, वर्षात 28 घरफोड्या, साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम सुरु, 25 ऑक्टोबरपर्यंत चालणार सर्वेक्षण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI