AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंगळसूत्र चोरांना 24 तासांच्या आत बेड्या, औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

औरंगाबादः वाळूज एमआयडीसीतील (Waluj MIDC) बजाजनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी महिलेचे मंगळसूत्र आणि मोबाइल हिसकावून घेणाऱ्या चोरांना पोलिसांनी चोवीस तासांच्या आता जेरबंद केले. या दोन्ही चोरट्यांकडून मंगळसूत्र व मोबाइल जप्त केला. गुरुवारी रात्री या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी पळवले होते. भाजी खरेदी करताना चोरला होता मोबाइल 21 ऑक्टोबर रोजी शारदा दिलीप तांबट (35) या गुरुवारी रात्री […]

मंगळसूत्र चोरांना 24 तासांच्या आत बेड्या, औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
मंगळसूत्र चोरणारे दोघे अटकेत, तिसरा मात्र फरार.
| Edited By: | Updated on: Oct 24, 2021 | 12:26 PM
Share

औरंगाबादः वाळूज एमआयडीसीतील (Waluj MIDC) बजाजनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी महिलेचे मंगळसूत्र आणि मोबाइल हिसकावून घेणाऱ्या चोरांना पोलिसांनी चोवीस तासांच्या आता जेरबंद केले. या दोन्ही चोरट्यांकडून मंगळसूत्र व मोबाइल जप्त केला. गुरुवारी रात्री या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी पळवले होते.

भाजी खरेदी करताना चोरला होता मोबाइल

21 ऑक्टोबर रोजी शारदा दिलीप तांबट (35) या गुरुवारी रात्री बजाजनगरातील जय भवानी चौकात असलेल्या भाजी मंडईत गेल्या होत्या. तेथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिराजवळ पाठीमागून लाल रंगाच्या दुचाकीवरून तिघे भामटे आले. त्यांनी शारदा तांबट यांच्या गळ्यातील 6 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व हातातील मोबाइल हिसकावून वडगावच्या दिशेने फरार झाले. तांबट यांनी एका भामट्याचे वर्णन पोलिसांना सांगितले होते. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांचा तत्पर तपास

पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी परिसरात शोध मोहीम राबवली होती. यातील दोन भामटे पंढरपूर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सापळा रचून राहुल अशोक धोत्रे व सलमान आरिफ शेख यांना मोठ्या शिताफीने जेरबंद केले. या दोघांची झडती घेतली असता शारदा तांबट यांचे मंगळसूत्र व मोबाइल सापडला. या दोघांकडे असलेल्या तिसऱ्या मोबाइलविषयी पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी हा मोबाइल चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. तिसरा चोर पसार असून त्याचा शोध सुरु आह. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेन ओगले, पो.ना प्रकाश गायकवाड, पो.ना. बाबासाहेब काकडे आदींनी पार पाडली.

पतीच्या हत्येत पत्नीसह चौघांना २८ ऑक्टोबरपर्यंत कोठडी

शहरातील अन्य एका घटनेत, अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने एक लाखात सुपारी देऊन हत्या करणाऱ्या पत्नीसह तिच्या तीन साथीदारांना चिकलठाणा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. चौघा आरोपींना 28 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एच. खेडकर यांनी शनिवारी दिले. रामचंद्र रमेश जायभाये (33) यांची हत्या करणारी त्यांची पत्नी मनीषा (25), प्रियकर गणेश ऊर्फ समाधान सुपडू फरकाडे (21, रा. पिसादेवी), राहुल आसाराम सावंत (22, रा. सातारा परिसर) आणि निकितेश अंकुश मगरे (21, रा. बालाजीनगर, मोंढा नाका) यांना पोलिसांनी अटक केली. रामचंद्र यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी पिसादेवी भागातील नाल्यात आढळून आला होता. मनीषाने पतीच्या हत्येसाठी एक लाखाची सुपारी दिली होती. त्यापैकी 21 हजार रुपये हत्येपूर्वी दिले होते. गुन्ह्यातील वापरलेला चाकू हर्सूल-पिसादेवी रोडवरील सुखना नदीच्या पाण्यात टाकल्याचे सांगितले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, सहायक सरकारी वकील नीता कीर्तिकर यांनी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले कपडे, हत्यार व वाहन जप्त करणे, गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली, रक्कम आरोपींनी कोठून आणली, याचा तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

इतर बातम्या-

Aurangabad Crime: कर्णपुऱ्यात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले, अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या ताब्यात 

Aurangabad Crime:  9 महिन्यात 62 गुन्ह्यांची उकल करण्यात श्वानांची मदत, औरंगाबाद पोलीस दलातील प्रशिक्षित श्वानांची कामगिरी  

Aurangabad crime: पानदरीबा भागात धाडसी चोरी, इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे शटर उचकटून अडीच लाखांचे साहित्य लंपास

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.