AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माय ही मायच असते… आईला पाहताच कंठ दाटला, अश्रू ओघळले; सरकारला जेरीस आणणारे जरांगे पाटील हेलावले

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. आजही सरकारने काहीच तोडगा काढला नाही. त्यामुळे जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून जरांगे पाटील यांना शिष्टमंडळ पाठवण्याचं आश्वासनही देण्यात आलेलं नाही.

माय ही मायच असते... आईला पाहताच कंठ दाटला, अश्रू ओघळले; सरकारला जेरीस आणणारे जरांगे पाटील हेलावले
Manoj Jarange Patil Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 08, 2023 | 2:39 PM
Share

जालना | 8 सप्टेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. गेल्या अकरा दिवसापासून जरांगे पाटील यांनी अन्नाचा एक कणही खालेल्ला नाही. त्यांची प्रकृती ढासळली आहे. त्यतांना बोलतानाही त्रास होतोय. अशक्तपणा आल्याने त्यांना उपोषणस्थळीच सलाईन लावली आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय उठायचंच नाही. नाही तर इथेच जीवनयात्रा संपवायची असा निश्चयच जरांगे पाटील यांनी केला आहे. तर दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकारने अजूनही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मराठा समाज प्रचंड संतापला आहे. सरकार विरोधात या समाजात प्रचंड राग निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांचं अंतरावली सराटी गावात उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा अकरावा दिवस आहे. गेल्या अकरा दिवसापासून जरांगे पाटील हे घराकडे गेले नाहीत. त्यांची प्रकृती ढासळल्याचं कळताच जरांगे पाटील यांच्या आई प्रभावती जरांगे यांनी आपल्या लढवय्या लेकाची भेट घेतली. आईला उपोषण स्थळी येताना पाहून जरांगे पाटील यांच्या काळजात कालवाकालव झाली. जरांगे पाटील यांचं मन हेलावलं. आई जवळ येताच जरांगे पाटील यांनी आईच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी आईला घट्ट मिठी मारली. यावेळी दोघेही भावूक झाले होते.

अन् सर्वच हेलावून गेले

त्यानंतर जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू ढासळू लागले. त्यांचा कंठही फूटत नव्हता. बोलता बोलत्या डोळ्यातून अश्रू वाहणे सुरूच होते. हे पाहून सर्वचजण हेलावले. मंचावरील आणि मंचासमोरील लोकांनाही अश्रू आवरणे कठिण झालं होतं. सर्वच हेलावून गेले होते.

मराठ्यांची मान झुकू देणार नाही

मी गावासाठी कर्म भूमीसाठी जीव पणाला लावला. माझ्यासाठी मराठा समाज पेटून उठला आहे. या पोराच्या पाठी उभं राहिलं पाहिजे म्हणून लोक माझ्यामागे उभे राहिले. महाराष्ट्रातील माता माऊल्यांना सांगतो या पुढे आरक्षणासाठी मुडदे पडू देणार नाही. जीव गेला तरी बेहत्तर मराठ्यांची मान खाली जाऊ देणार नाही. मी एकाही मराठ्याला झुकू देणार नाही. महाराष्ट्र आणि माझं गाव माझ्या मागे उभं आहे. याचा अभिमान आहे. मला बोलता येत नाही . मी तुमच्या ऋणात आहे, असं जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील बोलत असताना त्यांची आई त्यांचे अश्रू पुसत होत्या.

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

माझ्या बाळाला न्याय द्या

यावेळी जरांगे पाटील यांच्या आईनेही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी माझ्या मुलाच्या पाठी सर्वांनी उभं राहण्याचं आवाहनही केलं. मराठ्यांना आरक्षण द्या, माझ्या बाळाला न्याय द्या. सर्व बाळांना न्याय द्या. अशा भावना प्रभावती जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.