पैठण नगरपरिषदेचे व्यापारी संकुल जमीनदोस्त, अनधिकृतपणे बांधल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर कारवाई

दत्ता कानवटे

| Edited By: |

Updated on: Aug 26, 2021 | 4:21 PM

जिल्हा नगरविकास विभागाची कोणतीही परवानगी न घेता औरंगाबादमधील पैठण येथे एकनाथ महाराज मैदानावर एक व्यापारी संकुल बांधण्यात आले होते. यामध्ये तब्बल 44 गाळे हे बेकायदेशीर पद्धतीने बांधण्यात आले होते. या बांधकामाबाबत नंतर आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर 2016 सालीच न्यायालयाने हे व्यापारी संकुल पाडण्याचे आदेश दिले होते. अद्याप या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती.

पैठण नगरपरिषदेचे व्यापारी संकुल जमीनदोस्त, अनधिकृतपणे बांधल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर कारवाई
AURANGABAD PATHAN

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने अनधिकृत बांधकामांना हटवण्यासाठी आपली कंबर कसली आहे. प्रशासनाने पैठण (Paithan) नगरपरिषदेचे अनधिकृतपणे बांधण्यात आलेले व्यापारी संकुल अखेर पाडले आहे. यामध्ये व्यापारी संकुलातील तब्बल 44 गाळे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे व्यापारी संकूल बेकायदेशीर पद्धतीने बांधण्यात आले होते. विशेष म्हणजे एकनाथ महाराज यात्रा मैदानावर हे संकुल असल्यामुळे भाविकांमध्येही याबाबात तीव्र नाराजी होती. (market Complex demolished in Paithan Aurangabad after the order of district collector Sunil Chavan)

तब्बल 44 गाळे जमीनदोस्त

जिल्हा नगरविकास विभागाची कोणतीही परवानगी न घेता औरंगाबादमधील पैठण येथे एकनाथ महाराज मैदानावर एक व्यापारी संकुल बांधण्यात आले होते. यामध्ये तब्बल 44 गाळे हे बेकायदेशीर पद्धतीने बांधण्यात आले होते. या बांधकामाबाबत नंतर आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर 2016 सालीच न्यायालयाने हे व्यापारी संकुल पाडण्याचे आदेश दिले होते. अद्याप या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. मात्र, आता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या सूचनेनंतर हे सर्व व्यापारी संकुल जमीनदोस्त करण्यात आले आहे. यामध्ये अनधिकृतपणे बांधलेले एकूण 44 गाळे पाडण्यात आले आहेत.

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना चपराक

पाडण्यात आलेले व्यापारी संकूल एकनाथ महाराज यात्रा मैदानावर उभारण्यात आले होते. त्यामुळे या संकुलाविषयी भाविकांमध्येही तीव्र नाराजी होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर करण्यात आलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. तसेच केलेली ही कारवाई अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांसाठी चपराक असल्याचे म्हटले जात आहे.

जिल्हा परिषदेसाठी नवी इमरात बांधण्यात येणार

एकीकडे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई केली जात असली तरी दुसरीकडे प्रशासकीय इमारतीचे नव्याने निर्माण करण्यात येत आहे. या अतंर्गत औरंगाबाद जिल्हा परिषदेसाठी एक नवी इमरात बांधण्यात येणार आहे. या नव्या इमारतीमुळे सर्व विभाग येणार एकाच छताखाली येणार आहेत. त्यासाठी 37.83 कोटी रुपये खर्च केले जाणार असून ही नवी इमारात 4 मजली असणार आहे.

इतर बातम्या :

संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश, पैठणचे रुपडे पालटणार

BAMU: विद्यापीठातील विद्यार्थ्यांची शुल्ककपात, जाणून घ्या सविस्तर

कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ, औरंगाबाद विद्यापीठ अनाथ विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारणार

(market Complex demolished in Paithan Aurangabad after the order of district collector Sunil Chavan)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI