औरंगाबादः जानेवारीत राष्ट्रीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन, ऑटोमोबाइल कंपन्यांच्या प्रतिनिधींना ऑरिक सिटीची सफर

शहरातील सुविधांबाबत माहिती देऊन गुंतवणुकीसाठी या कंपन्यांना आकर्षित करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. हार्ले डेव्हिडसन, रिलायन्स, टाटा, फिरोदिया, सुझुकी, टीव्हीएस, ह्युंदाई, यामाहा, होंडासारख्या कंपन्यांच्या संचालकांना या परिषदेसाठी आमंत्रित केले जाणार आहे.

औरंगाबादः जानेवारीत राष्ट्रीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन, ऑटोमोबाइल कंपन्यांच्या प्रतिनिधींना ऑरिक सिटीची सफर
औरंगाबादेतील ऑरिक सिटीची सफर ऑटोमोबाइल कंपन्यांच्या प्रतिनिधींना घडवणार
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 12:33 PM

औरंगाबादः बड्या कंपन्यांनी उद्योगनगरी औरंगाबादमध्ये (Aurangabad Industry) गुंतवणूक करावी, या उद्देशाने नोव्हेंबर महिन्यात शहरात राष्ट्रीय गुंतवणूक परिषदेचे (National Investment Conference) आयोजन करण्यात आले आहे. येत्या 14,15,16 जानेवारीला ही परिषद आयोजित करण्यात आली असून या वेळी बड्या उद्योगांच्या प्रतिनिधींना ऑरिक सिटीची सफर घडवून शहरातील शिक्षण, वैद्यकीय सुविधा, दळणवळण आदी सुविधांचीही माहिती दिली जाणार आहे.

हार्ले डेव्हिडसन, रिलायन्स, टाटा, सुझुकी कंपन्यांचे प्रतिनिधी येणार

औरंगाबादेत होऊ घातलेल्या राष्ट्रीय परिषदेत हार्ले डेव्हिडसन, रिलायन्स, टाटा, फिरोदिया, सुझुकी यांच्यासारख्या ख्यातनाम बड्या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी ऑरिक सिटीची सफर घडवली जाईल. येत्या 15 दिवसांत या परिषदेची अंतिम रूपरेषा तयार होईल. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी शहराच्या दौऱ्यावर असताना उद्योग जगतातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी या परिषदेविषयी प्राथमिक चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ऑटोमोबाइल हबची ओळख सांगणार

औरंगाबाद शहराची ओळख जागतिक पातळीवर ऑटोमोबाइल हब अशी आहे. वाहनांचे कारखाने तसेच सुट्या भागांचे अनेक कारखाने औरंगाबादेत आहेत. सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या शेंद्रा, बिडकीन येथील डीएमआयसीत कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बड्या ऑटोमोबाइल कंपन्यांच्या संचालकांना या परिषदेच्या निमित्ताने शहरात आमंत्रित करून त्यांना डीएमआयसीतील उद्योगांसाठी पूरक असलेल्या पायाभूत सुविधा व शहरातील शैक्षणिक, वैद्यकीय सेवांसह इतर सुविधांबाबत माहिती देऊन गुंतवणुकीसाठी या कंपन्यांना आकर्षित करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. हार्ले डेव्हिडसन, रिलायन्स, टाटा, फिरोदिया, सुझुकी, टीव्हीएस, ह्युंदाई, यामाहा, होंडासारख्या कंपन्यांच्या संचालकांना या परिषदेसाठी आमंत्रित केले जाणार आहे.

पर्यटनस्थळांचेही प्रमोशन होणार

जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसास्थळांचे या संचालकांसमोर प्रमोशन केले जाईल. ड्रायपोर्ट, निर्यातीसाठीच्या सुविधा, होऊ घातलेल्या रस्ते, रेल्वे आणि विमानतळावरील सुविधांची माहितीही दिली जाईल. ऑरिक सिटीची सफर घडवून या ठिकाणच्या सुविधांची, विविध योजनांची माहितीही देण्यात येईल. इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरसाठीही उद्योजकांकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. अत्याधुनिक उपचार सुविधा असलेल्या औरंगाबादची मेडिकल टुरिझम डेस्टिनेशन म्हणूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. मुंबई-पुण्याप्रमाणे दर्जेदार मात्र किमी किमतीत उपचार येथे मिळत असल्याने परदेशातूनही अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. अवयवदान मोहिमेतही शहराचे नाव अग्रेसर आहे. हे मुद्देही गुंतवणूकदारांना पटवून सांगितले जातील.

इतर बातम्या-

जन्मजात दोष असलेल्या बालकांवरील शस्त्रक्रियांना कवच मिळण्याचे प्रयत्न, बाल शल्यचिकित्सा परिषदेत विचार

VIDEO: शाहरुख खानने भाजपात प्रवेश केला तर कोकेन नाही, पिठी साखर सापडली म्हणून सांगतील; भुजबळांची जोरदार टोलेबाजी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.