Aurangabad | बँकेतून काढलेले पैसे मोजू लागला, एवढ्यात भामट्याने रोखलं, हातचलाखीनं लांबवले तब्बल 31 हजार!

औरंगाबादः बँकेतून काढलेले पैसे बरोबर आहेत की नाही, हे तपासण्यासाठी पैसे मोजत बसलेल्या व्यक्तीला तब्बल 31 हजार रुपयांचा गंडा (Cheating) घातल्याची घटना औरंगाबादमध्ये (Aurangabad crime) घडली. वाळूज परिसरातील बजाज नगरातील आयडीबीआय बँकेत (IDBI Bank) ही घटना घडली. सोमवारी दुपारी शैलेश सुभाष सोनवणे हे बँकेत गेले असता बँकेतून काढलेले पैसे मोजत होते. तेव्हा एक इसम तेथे […]

Aurangabad | बँकेतून काढलेले पैसे मोजू लागला, एवढ्यात भामट्याने रोखलं, हातचलाखीनं लांबवले तब्बल 31 हजार!
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 12:20 PM

औरंगाबादः बँकेतून काढलेले पैसे बरोबर आहेत की नाही, हे तपासण्यासाठी पैसे मोजत बसलेल्या व्यक्तीला तब्बल 31 हजार रुपयांचा गंडा (Cheating) घातल्याची घटना औरंगाबादमध्ये (Aurangabad crime) घडली. वाळूज परिसरातील बजाज नगरातील आयडीबीआय बँकेत (IDBI Bank) ही घटना घडली. सोमवारी दुपारी शैलेश सुभाष सोनवणे हे बँकेत गेले असता बँकेतून काढलेले पैसे मोजत होते. तेव्हा एक इसम तेथे येऊन, यातल्या नोटा खराब आहेत, अशी बतावणी करू लागला. त्यानंतर बोलण्यातून त्याने 31 हजार रुपयांची रोकड लांबवल्याचं उघड झालं. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.

कसा घडला नेमका प्रकार?

शैलेष सुभाष सोनवणे हे जोगेश्वरी शिवारातील महेश इंटरप्रायजेस कंपनीक अकाउंटंट आहेत. शैलेश सोनवणे बजाज नगरातील आयडीबीआय बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास बँकेतून 1 लाख 10 हजार रुपये काढून तेथील बाकड्यावर पैसे मोजत बसले होते. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना रोखले. बंडलमधील नोटा खराब असल्याचे सांगत पैशाचे बंडल हातात घेतले. भामट्याने खराब नोटा बाजूला काढण्याची बतावणी करीत हातचलाखीने 31 हजार रुपये अलगद काढून घेतले. यादरम्यान बँकेतून पैसे काढण्यासाठी स्लीप भरुन देण्याची विनंती करीत एकाने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. तेवढ्यात नोटा काढून घेणारा भामटा गायब झाला. काही वेळानंतर सोनवणे यांनी बंडल मोजले असता त्यांना 500 रुपयांच्या 62 नोटी गायब झाल्याचे दिसून आले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

दरम्यान, बँकेच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता सोनवणे यांच्या हातातील नोटांचे बंडल घेणारी व्यक्ती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही व्यक्ती साधारण 35 ते 40 वर्ष वयोगटातील असावी, असा अंदाज आहे. तसेच स्लीप भरण्याचा बहाणा करणारा आणखी एकजणही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

इतर बातम्या-

PM Kisan Yojna : आता बॅंक खाते क्रमांकाची सक्ती नाही, मग काय आहे नवीन पर्याय, प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी

नागपूर बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्काराचे सावट! राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा असहकार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.