खुलताबाद पंचायत समितीच्या उभसभापतीपदी प्रभाकर शिंदेंची निवड, भाजप कार्यकर्त्यांचा आनंदात जल्लोष

खुलताबाद पंचायत समितीच्या उभसभापतीपदी प्रभाकर शिंदेंची निवड, भाजप कार्यकर्त्यांचा आनंदात जल्लोष
प्रातिनिधिक छायाचित्र

औरंगाबादः खुलताबाद पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रभाकर शिंदे यांची उपसभापतीपदी एकमताने निवड झाली. पंचायत समितीत भाजपचे पाच सदस्य निवडून आले आहेत. गेल्या पावणेपाच वर्षात आमदार प्रशांत बंब यांनी पाच पैकी चार सदस्यांना काही काळ सभापती आणि उपसभापती पदाचे पद दिले. उर्वरीत सदस्य प्रभाकर शिंदे यांना या पदाची संधी देणे बाकी होते. काल त्यांनी या पदासाठी निवड करण्यात आली.

महिनाभरापूर्वी युवराज ठेंगडे यांना राजीनामा

साधारण महिनाभरापूर्वी उपसभापती युवराज ठेंगडे यांना आमदार प्रशांत बंब यांनी उपसभापती पदाचा राजीनामा देण्याचे सूचवले होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. पंचायत समिती सभागृहात या पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र वाटप केले. यात प्रभाकर शिंदे यांचे एकच नामनिर्देशन पत्र आले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत निवडणुकीची सर्व प्रक्रिया पार पडली. दुपारी ही निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली.

भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

प्रभाकर शिंदे यांची उपसभापती पदावर निवड होताच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंचायत समिती परिसरात फटाके फोडून आनंद साजरा केला. नवनिर्वाचित उपसभापती प्रभाकर शिंदे यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

इतर बातम्या-

Zodiac | सेविंग करायची आहे ? मग या राशीच्या लोकांकडून शिका, बचत करणं हीच यांची ओळख

Nagpur administration | ऑक्सिजन प्लांट कसा हाताळणार?, प्रशिक्षित मनुष्यबळासाठी जिल्हा प्रशासन करतेय काम


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI