हिंदुत्व सांगून चालत नाही वागण्यातून दिसावं, प्रविण दरेकरांचा शिवसेनेला टोला

राम मंदिराच्या बाबतही शिवसेनेची भूमिका अगोदरच्या सारखी दिसत नसल्याचं प्रविण दरेकरांनी म्हंटले आहे. (Pravin Darekar Shivsena )

हिंदुत्व सांगून चालत नाही वागण्यातून दिसावं, प्रविण दरेकरांचा शिवसेनेला टोला
Pravin Darekar
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 5:27 PM

लातूर: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. प्रविण दरेकर यांनी आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका, लातूरचं राजकारण, धनंजय मुंडे प्रकरण, शेतकरी आंदोलन याविषयी भाष्य केले. उद्धव ठाकरेंनी हिदुत्व सांगून चालत नाही तर त्यांच्या वागण्यातून हिंदुत्व दिसून आले पाहिजे. सेक्युलर पक्षांशी हातमिळवणी केल्यांनतर हिंदुत्व कसं राहील असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला आहे. राम मंदिराच्या बाबतही शिवसेनेची भूमिका अगोदरच्या सारखी दिसत नसल्याचं त्यांनी म्हंटले आहे. (Pravin Darekar slams Shivsena over Hindutva at latur)

प्रवीण दरेकरांच्या पत्रकार परिषदेला आज लातूर जिल्ह्यातील तीनही आमदार उपस्थित होते. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर ग्रामीणच्या जागेबाबत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना दरेकर म्हणाले की, लातूर जिल्ह्यातलं राजकारण पाहता निलंगेकर यांनी व्यक्त केलेली भूमिका वैयक्तिक होती. त्यामुळं भाजपला कोणताही पक्ष जागा वाटपात फिक्सिंग करेल असं वाटत नाही असं ते म्हणाले आहेत .

धनंजय मुंडेंवरील पुष्पवृष्टी घाईची

धनंजय मुंडे यांच्यावर झालेला दुसरा आरोप ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. या प्रकरणात सत्य आल्या नंतर आम्ही आपलं अंतिम मत देऊ असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत. पहिल्या केसमधील आरोप मागे घेण्यात आल्य नंतर धनंजय मुंडे यांच्यावर क्रेनमधून केली गेलेली पुष्पवृष्टीही घाईची होती. आत या नव्या आरोपात सत्यस्थिती समोर आल्या नंतर आम्ही आमचं मत नोंदवू असं प्रविण दरेकर यांनी सांगितले आहे.

उलटा प्रवास करु नये, प्रविण दरेकरांची भूमिका

विधानसभा आण विधानसभा अध्यक्षांनी काय करावं हे नियम घालून देण्यात आलेले आहेत.निवडणूक हा विषय केंद्र सरकारच्या निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येत असतो. आपला देश सुधारणेकडे जाणारा आहे. त्यामुळं मतपत्रिकेवरुन आपण ईव्हीएम आणलं. आता उलटा प्रवास करण्याचा प्रयत्न दिसतोय. नियम सर्वांना सारखे असतात, सरकारं येतात आणि जातात. त्यामुळे पूर्वग्रहानं भूमिका घेऊ नये. भाजपला देशभरात यश मिळतं आहे. विरोधी पक्ष त्यांचं अपयश लपवण्यासाठी अशा भूमिका घेत आहे. देश प्रगतीकडं जात असताना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे, अशी भूमिका प्रविण दरेकरांनी मांडली.

संबंधित बातम्या: महाराष्ट्रातील मतदारांना आता मतत्रिकेचाही पर्याय?; पटोलेंनी दिल्या कायदा बनविण्याच्या सूचना

मतपत्रिकेद्वारे मतदान असावं की नसावं?; भाजपमध्येच संभ्रम?

(Pravin Darekar slams Shivsena over Hindutva at latur)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.