औरंगाबादेत 23 गावांत होणार खुली व्यायाम शाळा, गंगापूर, खुलताबादेत उभारणार, अंदाजपत्रक लवकरच!

गंगापूर तालुक्यातील जामगाव, नवाबपूर, बोलेगाव, बाबरगाव, पिंपळवाडी, भेंडाळा, कायगाव, भिवधानोरा, पखोरा, अगरवाडगाव, पुरी, सोलेगाव, अंमळनेर, पांढरओहळ येथे तर खुलताबाद तालुक्यातील खिर्डी, मावसाळा, लोणी, वेरूळ, कानडगाव, आखतवाडा, खांडी पिंपळगाव, बाजारसावंगी, कनकशीळमध्ये व्यायामशाळा होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

औरंगाबादेत 23 गावांत होणार खुली व्यायाम शाळा, गंगापूर, खुलताबादेत उभारणार, अंदाजपत्रक लवकरच!
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 3:00 AM

औरंगाबादः राज्यातील क्रीडा संस्कृती (Sports Culture) वाढावी, या उद्देशाने शासनाकडून क्रीडा आणि युवा धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. क्रीडा धोरणाच्या अनुषंगाने राज्यात विद्यार्थी आणि तरुणांसाठी व्यायामशाळा, (gymnasiums) क्रीडांगणे विकसित करण्याची योजना आहे. त्यापैकी व्यायामशाळा विकास आणि क्रीडांगण विकास अनुदान योजनेचा समावेश आहे. राज्यातील क्रीडा विभागामार्फत या योजना राबवण्यात येतात. त्याअंतर्गत ग्रामीण भागातील तरुण, तरुणींसह नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खुल्या व्यायामशाळा उभारण्यात येणार आहेत. जिल्हा नियोजन समितीने जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत गंगापूर आणि खुलताबाद (Khultabad) तालुक्यात 23 गावांत खुल्या व्यायामशाळा सुरु करण्याबाबत प्रस्ताव मागवले आहेत. आगामी काही दिवसात प्रस्ताव आल्यानंतर व्यायामशाळा उभारण्यात येणार आहेत.

राष्ट्रवादीचे संतोष माने यांची मागणी

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते संतोष माने यांनी क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पत्राद्वारे औरंगाबादामधील ग्रामीण भागात खुल्या व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत मंत्री आदिती तटकरे यांनी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना अंमलबजावणीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, जिल्हा नियोजन समितीने गत 17 फेब्रुवारीला जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना पत्राद्वारे या गावातील व्यायामशाळेच्या अनुषंगाने अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला आहे.

कोणत्या गावांत व्यायामशाळेचा प्रस्ताव?

गंगापूर तालुक्यातील जामगाव, नवाबपूर, बोलेगाव, बाबरगाव, पिंपळवाडी, भेंडाळा, कायगाव, भिवधानोरा, पखोरा, अगरवाडगाव, पुरी, सोलेगाव, अंमळनेर, पांढरओहळ येथे तर खुलताबाद तालुक्यातील खिर्डी, मावसाळा, लोणी, वेरूळ, कानडगाव, आखतवाडा, खांडी पिंपळगाव, बाजारसावंगी, कनकशीळमध्ये व्यायामशाळा होतील.

7 लाखांचा निधी लागणार

खुल्या व्यायामशाळेसाठी साधारण दोन ते तीन गुंठे जागा लागणार आहे. यात लहान मुलांसह तरुण, महिला आणि वृद्धांच्या दृष्टीकोनातून आवश्यक ते साहित्य देण्यात येणार आहे. तसेच या व्यायामशाळेसाठी पाच ते सात लाखांचा निधी मंजूर करण्यात येणार असून परिसरातील नागरिकांना याचा लाभ होईल. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या अनुषंगाने पत्र प्राप्त झाले असून संबंधित गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायत स्तरावरून प्रस्ताव मागवून अंदाजपत्रक सादर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी दिली.

इतर बातम्या-

“लय सुसाट, ताणूताणू मागं लागलीय ईडी”, नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा, राष्ट्रवादीचं खास नवं गाणं, ऐकाच….!

कोरोनाची चौथी लाट 22 जूनपासून, IIT कानपूरमधील संशोधकांच्या अभ्यासातून निष्कर्ष समोर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.