औरंगाबाद जिल्ह्यातील शिउर परिसरात दुकानांना मध्यरात्री भीषण आग, जेसीबीने दुकानाचे शटर फोडून आग विझवली

तब्बल तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात सर्वांना यश आले. दरम्यान, कृषी सेवा केंद्रातील सर्व राजायनिक पदार्थ जळून खाक झाले. त्यामुळे या आगीत कृषी सेवा केंद्राचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील शिउर परिसरात दुकानांना मध्यरात्री भीषण आग, जेसीबीने दुकानाचे शटर फोडून आग विझवली
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 3:35 PM

औरंगाबाद: जिल्ह्यातील शिउर परिसरातील दुकानांना काल 23 सप्टेंबर रोजी मध्यरात्री भीषण आग लागली. कृषीसेवा केंद्रांना ही आग लागल्याने तेथील रासायनिक उत्पादनांमुळे आगीचा भडका जास्त उडाला. त्यामुळे ही आग विझवताना अग्निशामक दलालाही भयंकर कसरत करावी लागली. दुकानांमध्ये आगीचे लोळ उठत होते, पण शटर बंद असल्यामुळे आग आटोक्यात कशी आणायची हा पेच औरंगाबादच्या अग्निशामक दलासमोर होता. (shops set on fire at midnight in Shiur area of ​​aurangabad shop shutters opened with the help of jcb )

जेसीबीच्या मदतीने दुकानांचे उघडले शटर

शिउर परिसरात काल मध्यरात्री अचानक ही आग लागली. या परिसरातील कृषी सेवा केंद्रांना ही आग लागली. त्यामुळे केंद्रातील बियाणे, खते, किटकनाशके, औषधी, फवारणीचे सामान या सर्व रासायनिक उत्पादनांनी जास्तच पेट घेतला. ही आग मध्यरात्री लागल्याने परिसरातील लोकांची धावपळ उडाली. दुकांनांमधील आग आटोक्यात आणण्यासाठी आधी लोकांनी दुकानांचे शटर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश येत नव्हते. तोपर्यंत काही नागरिकांनी अग्निशामक दलाला बोलावले. दलातील कर्मचाऱ्यांनीही दुकानाचे शटर लवकरात लवकर उघडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. अखेर शटर उघडण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. अग्निशामक दलातील कर्मचारी, परिसरातील लोकांनी जेसीबीच्या मदतीने दुकानांचे शटर फोडले. त्यानंतर पाण्याचे फवारे मारून ही आग विझवण्यात आली.

तब्बल तीन आगीचे लोळ

जिल्ह्यातील शिउर परिसरातील कृषी सेवा केंद्रांना लागल्याने दुकानातील रासायनिक उत्पादनांमुळे आगीने जास्तच पेट घेतला. ही आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक, अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना आटोकाट प्रयत्न केले. तब्बल तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात सर्वांना यश आले. दरम्यान, कृषी सेवा केंद्रातील सर्व राजायनिक पदार्थ जळून खाक झाले. त्यामुळे या आगीत कृषी सेवा केंद्राचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शहरातील मांस विक्रेत्याचे दुकान फोडले

दरम्यान, औरंगाबाद शहरातील भाजीवालीबाई पुतळा चौकातील शरद कराळे यांचे मांस विक्रीचे दुकान फोडून चोरांनी गल्ल्यातील पाच हजार रुपये चोरून नेले. 21 सप्टेंबर रोजी मध्यरात्री हा प्रकार घडला. 22 सप्टेंबर रोजी सकाळी दुकानदार गेले असता शटर उचकलटलेले दिसले. चोरांनी आतील पाच हजार रुपये रोख चोरून नेल्याचे पाहणीत समोर आले आहे.या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

इतर बातम्या- 

Aurangabad Flood | मानवी साखळी करून विद्यार्थ्यांची सुटका, औरंगाबादेत रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

औरंगाबादला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, सुटे भाग मिळत नसल्याने दुरुस्तीस एक दिवस विलंब

(shops set on fire at midnight in Shiur area of ​​aurangabad shop shutters opened with the help of jcb )

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.