औरंगाबादः सिल्लोडच्या सुपुत्राची पंतप्रधानांसोबत दिवाळी, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव

औरंगाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 04 नोव्हेंबर रोजी गुरुवारी जम्मू काश्मीरच्या सीमेवर जाऊन तेथील भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमाला औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील लोणवाडीचे सुपुत्र आमि सैनिक योगेश सुलताने यांना सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सिल्लोडच्या सैनिकाला मिठाई खाऊ घालत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण औरंगाबादमध्ये हा […]

औरंगाबादः सिल्लोडच्या सुपुत्राची पंतप्रधानांसोबत दिवाळी, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव
सिल्लोडचे सुपुत्र योगेश सुलताने यांचे पंतप्रधानांसोबतचे फोटो व्हायरल
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 3:40 PM

औरंगाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 04 नोव्हेंबर रोजी गुरुवारी जम्मू काश्मीरच्या सीमेवर जाऊन तेथील भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमाला औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील लोणवाडीचे सुपुत्र आमि सैनिक योगेश सुलताने यांना सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सिल्लोडच्या सैनिकाला मिठाई खाऊ घालत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण औरंगाबादमध्ये हा चर्चेचा आणि अभिमानाचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर या सैनिकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

फोटो पाहून गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना

सिल्लोड तालुक्यातील लोणवाडीचे सुपुत्र योगेश विठ्ठलराव सुलताने हे जम्मूच्या सीमेवर कर्तव्य बजावत आहेत. सीमेवरील सैनिकांना कोणताही सण आपल्या कुटुंबासोबत साजरा करण्याचा आनंद बहुधा लुटताच येत नाही. यंदाची दिवाळीदेखील देशभरात मोठ्या जल्लोषात साजरी झाली. पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीर्चया सीमारेषेवर जाऊन भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमात मोदी यांनी जम्मू सीमेवरील कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलताने यांना मिठाई भरवत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि कुटुंबासह गावकऱ्यांचा आनंदाला पारावार उरला नाही.

गावकऱ्यांसाठी संस्मरणीय दिवाळी, फटाके वाजवून आनंद साजरा

गावातील सैनिकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यंदाची दिवाळी साजरी करण्याचा बहुमान मिळणे, ही बाब खरोखरच गावातील सर्व गावकऱ्यांसाठी अभिमानास्पद आहे. ही दिवाळी आमच्या गावातील सर्व नागरिकांसाठी संस्मरणीय राहील, अशी प्रतिक्रिया लोणवाडीचे उपसरपंच कारभारी काटकर यांनी दिली. योगेश सुलतानेचे पंतप्रधानांसोबतचे फोटो पाहून माजी जिल्हा परिषद सदस्य हरिकिशन सुलताने, सरपंच भाऊसाहेब सुलताने, उपसरपंच कारभारी काटकर, संजय सुलताने आदींनी फटाके फोडून आनंद साजरा केला.

इतर बातम्या-

औरंगाबादः लेबर कॉलनीवासीय रस्त्यावर, जीव मुठीत, घरावर टांगती तलवार… 10.30 वाजता कारवाई होण्याच्या दिल्या होत्या सूचना…

औरंगाबाद महापालिका आता फक्त इलेक्ट्रिक वाहनेच खरेदी करणार, डिझेल, पेट्रोल वाहनांची खरेदी बंद!

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.