AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather: ऐन हिवाळ्यात ढगांचे मळभ का? तळपता सूर्य पुन्हा का गायब झाला? वाचा मराठवाड्यातला हवामानाचा अंदाज

पुढील आठ दिवस असेच वातावरण राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तापमानात किंचित चढ-उतार होईल. गारवा, उकाडा, दमट असे संमिश्र वातावरण राहील.

Weather: ऐन हिवाळ्यात ढगांचे मळभ का? तळपता सूर्य पुन्हा का गायब झाला? वाचा मराठवाड्यातला हवामानाचा अंदाज
मराठवाड्यात गारवा वाढला असून आकाशात ढगांचे अच्छादनही पहायला मिळत आहे.
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 9:56 AM
Share

औरंगाबादः मागील आठवड्यात औरंगाबाद आणि जवळपास संपूर्ण मराठवाड्यात हलक्या थंडीची (Winter in Marathwada) लाट आली होती. सकाळी काही ठिकाणी धुकं जमा होत होतं. अनेक ठिकाणी हिवाळ्यातील गुलाबी थंडीची जाणीवही होत होती. तर दुपारी कडक ऊन होतं. अतिवृष्टीने ग्रासलेल्या मराठवाड्याला हिवाळा सुरु झाल्यामुळे थोडं हायसं वाटत होतं. पण मागील दोन दिवसांपासून वातावरणात पुन्हा बदल झालेला जाणवत आहे. हवेत गारवा असला तरीही दुपारचं ऊन पूर्णपणे गायब झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद आणि परिसराला सूर्यदर्शनच झालेलं नाही.

उत्तरेतील बर्फवृष्टीचा परिणाम

राज्यात काही ठिकाणी ऑक्टोबर हिट जाणवत आहे. मात्र उत्तरेत बर्फवृष्टी सुरू आहे. तेथील शीत वारे वाहून इकडे येत आहे. त्यामुळे गेल्या 17 दिवसांत किमान तापमानात 22 अंशांवरून 15 अंश म्हणजे 6 ते 7 अंशापर्यंत घट झालेली  दिसून येत आहे. थंड,  बाष्पयुक्त, उष्ण वाऱ्याचा आकाशात संगम होऊन दुपारनंतर ढग जमा होत आहेत. सोमवारी सायंकाळी शहरावर अशीच दाट ढगांची चादर पसरली होती. पुढील आठ दिवस असेच वातावरण राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तापमानात किंचित चढ-उतार होईल. गारवा, उकाडा, दमट असे संमिश्र वातावरण राहील. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

सोमवारी औरंगाबादेत ढगांचे अच्छादन

हिवाळा सुरु होताच हवामानात वेगाने बदल होत आहेत. औरंगाबादकरांनाही याचा अनुभव येत आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास औरंगाबादेत ढगांची दाट चादर पसरली होती. यामुळे 22 ऑक्टोबर रोजी प्रथमच रात्रीचे तापमान 15 अंशांपर्यंत घसरले होते. मात्र, गेल्या तीन दिवसांत ढगाळ वातावरणामुळे त्यात किंचित 1.3 अंशांपर्यंत वाढ होऊन ते 16.3 अंशांवर स्थिरावले. पुढील आठ दिवस औरंगाबादसह अनेक भागांत ढगांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

औरंगाबादचे घसरते तापमान

18 ऑक्टो. 21.2 19 ऑक्टो. 19.1 20 ऑक्टो. 17.2 21 ऑक्टो. 16.2 22 ऑक्टो. 15.1 23 ऑक्टो. 16.2 24 ऑक्टो. 16.2 25 ऑक्टो. 16.2

हिवाळ्यात कोणती फळे खाणे चांगले?

संत्री खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण म्हणजे ते स्वादिष्ट असण्यासोबतच सर्व आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. हे रोग प्रतिकारशक्ती वाढव ण्यास मदत करते. हिवाळ्याच्या काळात आजारी पडण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे या मोसमात रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या संत्रीचे सेवन केले पाहिजे. हिवाळ्यामध्ये डाळिंबाचे सेवन करणे फायदेशीर आहे. डाळिंब खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे या हंगामात दररोज किमान एकतरी डाळिंब खाल्ले पाहिजे. अंजीर पोटॅशियमचा एक उत्तम स्रोत आहे. जो शरीराला रक्तदाब राखण्यासाठी आवश्यक असलेले खनिज आहे. गरम आणि वाफेदार, तेलकट पदार्थ हिवाळ्यात जास्त खाल्ले जातात. त्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोटॅशियम समृध्द आहार घेणे आवश्यक आहे.

इतर बातम्या-

‘फेसबुक फ्रेंड’च्या भेटीसाठी बंगळुरूहून औरंगाबादेत आली मैत्रीण, मित्राच्या घरीही पोहचली, पण… काय घडलं पुढे?

औरंगाबाद जिल्ह्यातील ई-फेरफार 14 दिवस बंद, तलाठ्यांचा संप सुरूच, पुण्यातली तोडग्याची बैठक निष्फळ

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.