AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेडिज गाऊन घरफोडी करणारा चुन्नू पोलिसांच्या जाळ्यात , औरंगाबादच्या गुन्हेशाखेची कारवाई

37 वर्षीय नईम हा जटवाडा रोडवरील सईदा कॉलनीतील रहिवासी असून त्याने काही वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीला सोडून देत दुसरा विवाह केला. त्याला एकूण सात मुले आहेत. नईमवर खून आणि मारहाणीचे गुन्हेही दाखल आहेत.

लेडिज गाऊन घरफोडी करणारा चुन्नू पोलिसांच्या जाळ्यात , औरंगाबादच्या गुन्हेशाखेची कारवाई
चोरी करण्यासाठी लेडिज गाऊन व स्वेटर घालणारा नईम ऊर्फ चुन्नू पोलिसांच्या जाळ्यात
| Edited By: | Updated on: Sep 21, 2021 | 12:21 PM
Share

औरंगाबाद: घरफोडी करताना पोलिसांना संशय येऊ नये म्हणून चोराने अजब शक्कल लढवल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. आपण गाऊन घातल्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासताना ही कुणी महिलाच आहे, असा पोलिसांचा समज होईल, अशी आशा चोराला होती. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या (Aurangabad Crime Branch Police) नजरेतून चोरट्याची ही अजब शक्कल सुटली नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीतील या चोराला औरंगाबाद पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. नईम ऊर्फ चुन्नू उस्मान शहा (Chunnu Usman Shaha) असे या चोरट्याचे नाव आहे.

घराला कुलूप दिसताच फोडायचा

हर्सूल परिसरातील कडुबाई बालाजी चाथे यांच्या पतीवर शस्त्रक्रिया होणार असल्याने सहा दिवसांपूर्वी त्या घराला कुलूप लावून रुग्णालयात गेल्या होत्या. तेव्हा चोराने कुलूप तोडून 6 तोळे सोने व इतर ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. तपासानंतर पोलिस नईमपर्यंत पोहोचले. त्यानंतर त्याने एन-1 सिडको, मयूरपार्क, जटवाडा अशा उच्चभ्रू वसाहतींमध्येही याच पद्धतीने घरफोडी केल्याचे तपासात उघड झाले.

 नईम ऊर्फ चुन्नूची अजब शक्कल

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण कैद झालोच तर पोलिसांना कळू नये किंवा परिसरातील नागरिकांनाही सुगावा लागू नये, यासाठी चोरी करणाऱ्या नईम ऊर्फ चुन्नू उस्मान शहा याने ही अजब शक्कल लढवली. ज्या घरात चोरी करण्यासाठी जायचे, तिथे तो लेडिज गाऊन आणि त्यावर स्वेटर घालून जात असे. एखादे घर बंद दिसताच तो फोडत होता. मात्र पोलिसांच्या नजरेतून नईमची ही चालाखी सुटली नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक दत्ता शेळके हे याप्रकरणी तपास करत असताना त्यांना नईम अशी विचित्र पद्धत वापरून चोरी करत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

शहरातील विविध वसाहतींमध्ये घरफोड्या

महिलांचा गाऊन घालून नईमने शहरातील विविध वसाहतींमध्ये यापूर्वी घरफोड्या केल्याचे कबूल केले. यात 29 ऑगस्ट रोजी अॅड. खलील अहमग गुलाम (55, रा. एन-1 सिडको) यांचे घरही फोडून त्याने रोख रक्कम आणि दागिने पळवले होते. तसेच मयूरपार्क आणि जटवाड्यातील काही घरांमध्येही त्याने हीच पद्धत वापरून चोरी केल्याचे सांगितले. 37 वर्षीय नईम हा जटवाडा रोडवरील सईदा कॉलनीतील रहिवासी असून त्याने काही वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीला सोडून देत दुसरा विवाह केला. त्याला एकूण सात मुले आहेत. नईमवर खून आणि मारहाणीचे गुन्हेही दाखल आहेत.

इतर बातम्या- 

Aurangabad Crime: झाडाला लटकलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे रहस्य उलगडले, पत्नीचे तरुणासोबतचे एडिट केलेले फोटो पाहून आले होते नैराश्य

Aurangabad Crime: जनावरांची चोरी करून धुमाकुळ घालणारी टोळी बैलपोळ्याच्या दिवशी जेरबंद

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.