Aurangabad: फारोळ्यातल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत!

फारोळ्यातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहे.

Aurangabad: फारोळ्यातल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत!
प्रातिनिधिक छायाचित्र

औरंगाबादः महापालिकेच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुक्रवारी दुपारी अचानक बिघाड झाला. येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला. शुक्रवारी संध्याकाळी तसेच शनिवारीही शहराला नियोजित वेळेत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्याता आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

वेळापत्रक एक दिवस पुढे

सिडको-हडकोसह जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 100 एमएलडी योजनेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शुक्रवारी दुपारी अचानक बिघाड झाला. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला. संध्याकाळी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. मात्र शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले. शहराच्या ज्या भागात शुक्रवारी पाणीपुरवठा होणार होता, त्या भागात आता शनिवारी पाणीपुरवठा होईल. ट्रान्सफॉर्मवर दुरुस्तीच्या काळात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ढोरकीन येथील पाण्याची गळती बंद करण्याचे काम केले. येथील एक एअर वॉल्व्हदेखील बदलण्यात आला. ही माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली.

इतर बातम्या-

MSEC Scholarship Result Topper : पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा, अहमदनगरचा डंका, गुणवत्ता यादी जाहीर

ओव्हरटेक करताना स्कूटर घसरली, पुण्यात 20 वर्षीय तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI