बीड प्रशासनाची अक्कल ठिकाणावर आहे का? झाडावर चढून आंदोलन करतात म्हणून वृक्षांची कत्तलच करत सुटलेत!

बीड प्रशासानाला विचार करायचा नसेल तर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या सक्रिय नेत्या पंकजा मुंडे यांचं तरी या कृतीकडे लक्ष आहे का? तेही नसेल तर पर्यावरण मंत्र्यांकडेही दाद मागण्याची इथल्या निसर्गप्रेमींची तयारी आहे.

बीड प्रशासनाची अक्कल ठिकाणावर आहे का? झाडावर चढून आंदोलन करतात म्हणून वृक्षांची कत्तलच करत सुटलेत!
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 1:03 PM

बीड : एखाद्याच्या हातून रागा-रागात एखादी चूक झाली तर ती समजू शकते. पण तुमची चूक होतेय, हे वारंवर कुणी लक्षात आणून दिलं तरीही तीच चूक घडत राहिली तर चूक करणाऱ्याची अक्कल ठिकाणवार आहे का, असाच प्रश्न पडतो. बीड प्रशासनाची एक कृती असाच प्रश्न विचारायला भाग पाडत आहे. मागील काही दिवसांपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Beed Collector office) अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी अनेक सामान्य लोक आंदोलन करतात. त्यात आंदोलन अधिक तीव्र होण्यासाठी काही जणांनी येथील झाडावर चढून जीव देण्याचा इशाराही दिलेला आहे. या घटनात काही जीवितहानी होऊ नये, ही धास्ती येथील प्रशासनाला वाटत आहे. यावर एक जालीम उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मोठ-मोठ्या झाडांचीच (Beed Tree) कत्तल करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मागील आठवड्यात या परिसरातील एक मोठे कडुलिंबाचे झाड तोडण्यात आले. त्यानंतर आता परिसरातील इतर झाडेही कापली जात (Tree Cutting) आहे. प्रशासनानंच निसर्गाचा आणि पर्यावरण रक्षणाचा विचार न करता सुरु केलेली ही मोहीम पाहून निसर्गंप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.

निसर्गप्रेमींची झाडाला श्रद्धांजली

मागील आठवड्यातच बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भले मोठे कडुलिंबाचे झाड कापण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून येथील आंदोलकांना, कार्यालयात येणाऱ्या सामान्य जनतेला सावली देणाऱ्या या झाडाचा बुंधाही मजबूत स्थितीत होता. प्रशासानाने तर झाडावर आंदोलक चढतात म्हणून मशीनने कटर लावून त्याचे खोड कापले. भले मोठे झाड कोसळताना पाहण्याचे दुःख निसर्गप्रेमींना आनवर झाले. त्यांनी प्रशासानाचा निषेध व्यक्त करत याठिकाणी झाडाला श्रद्धांजली वाहिली. हे निषेधात्मक, उपहासात्मक आंदोलन केल्यानंतर अनेक माध्यमांतून बीड प्रशासनावर टीका सुरु झाली. बीड प्रशासनाला डोकं आहे का, असा सवाल विचारण्यात आला. मात्र तरीही ही कृती सुरुच आहे, हे पाहून पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र असंतोष आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांचं लक्ष आहे का?

बीड प्रशासानने सध्या जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसील कार्यालयासमोरील सर्वच मोठी झाडे कापण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र आंदोलक झाडावर चढतात म्हणून झाड कापणे हा पर्याय असू शकत नाही, असे पर्यावरण प्रेमी वारंवार सांगत आहेत. झाडाला मोठे कुंपण करणे, त्याच्या खोडावरून लोकांना चढता येऊ नये, यासाठी काही उपाययोजना करू शकतात. पण तसं न करता झाडं तोडली जात आहेत. तसेच झाडं तोडली तरी उद्या आंदोलक उंच बिल्डिंगवर उभे राहून आंदोलन करू शकतील, मग तुम्ही बिल्डिंगदेखील पाडणार का, असा सवाल जिल्हा प्रशासनाला पर्यावरण प्रेमी विचारत आहेत. सारासार विवेकबुद्धीने विचार न करता झाडांची कत्तल करण्याची मोहीम सुरु केलेल्या बीड प्रशासनाला या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. बीड प्रशासानाला विचार करायचा नसेल तर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या सक्रिय नेत्या पंकजा मुंडे यांचं तरी या कृतीकडे लक्ष आहे का? तेही नसेल तर पर्यावरण मंत्र्यांकडेही दाद मागण्याची इथल्या निसर्गप्रेमींची तयारी आहे.

इतर बातम्या-

चर्चा तर होणारचः लोढा-राज यांच्या भेटीचे गुपित काय; मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर दोस्ताना होणार का?

Solapur police initiative : तृथीयपंथीय समाजही मानानं जगणार! सोलापुरात पोलिसांनी सुरू केलाय ‘हा’ अनोखा उपक्रम

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.