दार उघड बये दार उघड, तुळजाभवानी मंदिरासमोर पुजारी-व्यापाऱ्यांचं लाक्षणिक उपोषण सुरू

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर सुरू करण्यासाठी तुळजापूर येथील पुजारी व व्यापारी आक्रमक झाले आहे. मंदिर सुरू व्हावे म्हणून व्यापारी आणि पुजाऱ्यांनी मंदिरासमोर लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे. (tulja bhavani temple priest agitation at front of temple)

दार उघड बये दार उघड, तुळजाभवानी मंदिरासमोर पुजारी-व्यापाऱ्यांचं लाक्षणिक उपोषण सुरू
tulja bhavani temple

उस्मानाबाद: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर सुरू करण्यासाठी तुळजापूर येथील पुजारी व व्यापारी आक्रमक झाले आहे. मंदिर सुरू व्हावे म्हणून व्यापारी आणि पुजाऱ्यांनी मंदिरासमोर लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे. ‘दार उघड बये आता दार उघड’, ‘आई राजा उदो उदो’ अशी घोषणाबाजी करत पुजारी-व्यापाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली. (tulja bhavani temple priest agitation at front of temple)

मंदिर बंद असल्याने पुजारी आणि व्यापाऱ्यांची उपासमार होत असून अर्थकारण ठप्प झाले आहे. राज्यातील सर्व व्यवहार खुले झाले आहेत. रेल्वे, बस, मॉल, दारूचे बार सुरू आहेत. तरीही मंदिर, धार्मिक स्थळे बंद का? असा सवाल पुजाऱ्यांनी उपस्थित केला आहे. या लाक्षणिक उपोषणात व्यापारी, नागरिक सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास तुळजापूर बेमूदत बंद करण्याचा इशारा पुजाऱ्यांनी यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांना भेटणार

ठाकरे सरकारने मंदिराबाबत दुजाभाव का सुरू केला आहे. मंदिरं खुली झाली नाही तर यापुढे लाक्षणिक उपोषण केलं जाणार नाही. आम्ही तीव्र स्वरुपाचं आंदोलन करू, असा इशारा मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिला आहे. पुजारी आणि व्यापाऱ्यांच्या या लाक्षणिक उपोषणाला तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटीलही उपस्थित होते. त्यांनीही मंदिरे खुली करण्याची जोरदार मागणी केली. तसेच पुजारी-व्यापाऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं सांगतानाच मंदिरे खुली झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. (tulja bhavani temple priest agitation at front of temple)

संबंधित बातम्या:

दादा, तुमचं जेवढं वय, तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द; रुपाली चाकणकरांचा वार

ब्लॅक फंगसच्या भीतीने आत्महत्या करतोय, अंत्यसंस्कारासाठी 1 लाख ठेवलेत, पोलिसांना फोन करुन सुसाईड!

पाश्चात्य देशांना लाज वाटली पाहिजे! अफगाणिस्तान प्रकरणावर संतापले जावेद अख्तर आणि शबाना आझमी

(tulja bhavani temple priest agitation at front of temple)

Published On - 3:20 pm, Tue, 17 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI