उद्धव ठाकरे, पंकजा मुंडे आणि अशोक चव्हाण एकाच मंचावर एकत्र येणार? मराठवाड्यातील घडामोडी वेधणार राज्याचं लक्ष

चेतन पाटील, Tv9 मराठी

Updated on: Nov 28, 2022 | 7:24 PM

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती पाहता येत्या डिसेंबर महिन्यात मराठवाड्यात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे.

उद्धव ठाकरे, पंकजा मुंडे आणि अशोक चव्हाण एकाच मंचावर एकत्र येणार? मराठवाड्यातील घडामोडी वेधणार राज्याचं लक्ष

औरंगाबाद : महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती पाहता येत्या डिसेंबर महिन्यात मराठवाड्यात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. कारण येत्या डिसेंबर महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण एकाच कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. संबंधित कार्यक्रम हा मराठवाड्यात आयोजित करण्यात आलाय. त्यामुळे डिसेंबर महिन्यात घडणाऱ्या घडामोडींकडे राज्याचं निश्चितच लक्ष असण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडी पाहता जे तीन नेते एकाच कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आलीय त्यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून वारंवार वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी पहिले नेते असलेले उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये मोठमोठे राजकीय आघात सोसले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना दोन भागात विभागली गेलीय.

दुसरीकडे पंकजा मुंडे या भाजपात नाराज असल्याच्या चर्चा वारंवार समोर येत असतात. पंकजा यांना पक्षाकडून विधान परिषद किंवा राज्यसभेच्या निवडणुकीची उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे मधल्या काळात पंकजा यांच्या नाराजीच्या बातम्या समोर आल्या होत्या.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे देखील भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना गेल्या महिन्यात प्रचंड उधाण आलं होतं. पण त्यांनी माध्यमांसमोर येत या सगळ्या चर्चा खोट्या आहेत त्या मुद्दामून घडवून आणल्या जात असल्याची टीका केली होती.

गेल्या काही दिवसांमधील उद्धव ठाकरे, पंकजा मुंडे आणि अशोक चव्हाण यांच्याबद्दल अशा वेगवेगळ्या बातम्या येत असताना हे तीनही बडे नेते मराठवाड्यातील एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटक असणार आहेत. 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची तारीख जाहीर झालीय. येत्या 10 आणि 11 डिसेंबरला जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथे मराठवाडा साहित्य संमेलन होणार आहे.

मराठवाड्यातील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी संमेलनातील सत्रात माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा असेल सहभाग असेल, अशी माहिती समोर आलीय. तर अमृत महोत्सवी वर्षापर्यंत मराठवाड्याला काय मिळाले? या चर्चासत्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित राहतील.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, हे तीनही नेते एकाच मंचावर एकत्र दिसतील का? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या कार्यक्रमाकडे राज्याचं विशेष लक्ष असण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI