@Aurangabad: दोन दिवस महोत्सवी वातावरण, झुंबा, कला प्रदर्शन अन् लाइव्ह कार्यक्रमांची मेजवानी

क्रांती चौक येथे 2 ऑक्टोबरला सकाळी 7 ते 9 या वेळेत फ्रीडम वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकचे उद्घाटन खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते होणार आहे.

@Aurangabad:  दोन दिवस महोत्सवी वातावरण, झुंबा, कला प्रदर्शन अन् लाइव्ह कार्यक्रमांची मेजवानी
'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत औरंगाबादेत विविध कार्यक्रमांचे आयोजन

औरंगाबाद: ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी स्मार्ट सिटी औरंगाबाद (Smart city Aurangabad) आणि औरंगाबाद महानगरपालिका (Aurangabad Municipal corporation) यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आजपासून कॅनॉट परिसरात सकाळी 7 ते 9 यावेळेत झुंबा त्याबरोबरच दिवसभरात कला कार्यशाळा, खेळ आणि फिटनेस कार्यशाळा, स्वसंरक्षण कार्यशाळा, लाईव्ह म्युझिक हे कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांना सर्वच वर्गातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाच्या निमित्ताने पुढील दोन दिवस म्हणजेच 2 आणि 3 ऑक्टोबर दरम्यान देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारच्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

1 ऑक्टोबर 2021ला 10:30 ते 12:30 या वेळेत कला कार्यशाळा आणि इंग्रजी बोलण्याची कार्यशाळा, तर दुपारी 2 ते 4 या वेळेत पाककला कार्यशाळा, हस्तलेखन आणि मेहंदी कार्यशाळा, दुपारी 3:30 ते 5:30 या वेळेत पालकत्व कार्यशाळा (1-8 वर्षांच्या मुलांसह पालक) घेण्यात आली. तर संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत खेळ आणि फिटनेस कार्यशाळा, दुपारी 4 ते 6 या वेळेत स्वसंरक्षण कार्यशाळा घेतली गेली.

02 ऑक्टोबरला फ्रीडम वॉक

क्रांती चौक येथे 2 ऑक्टोबरला सकाळी 7 ते 9 या वेळेत फ्रीडम वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकचे उद्घाटन खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते होणार आहे. क्रांती चौक ते अहिल्याबाई होळकर चौक आणि परत क्रांती चौक असे या वॉकचे स्वरूप आहे. यामध्ये लेझिम, एनएसएस मार्च यांचे प्रात्यक्षिक देखील होणार आहे.

शनिवारी कोणकोणते कार्यक्रम

2 ऑक्टोबर 2021 ला सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेत कला कार्यशाळा, दुपारी 2 ते 4 या वेळेत पाककला कार्यशाळा व हस्तलेखन आणि मेहंदी कार्यशाळा, दुपारी 3:30 ते 5:30 या वेळेत पालकत्व कार्यशाळा (1-8 वर्ष), दुपारी 3 ते 4 या वेळेत रांगोळी स्पर्धा, संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत खेळ आणि फिटनेस कार्यशाळा तर दुपारी 4 ते 6 या वेळेत स्वसंरक्षण कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात आले आहे.

3 ऑक्टोबर 2021 रोजीचे कार्यक्रम

रविवारी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेत कला कार्यशाळा आणि इंग्रजी बोलणे कार्यशाळा, पाककला कार्यशाळा, दुपारी 2 ते 4 या वेळेत सुलेखन आणि मेहंदी कार्यशाळा, दुपारी 3:30 ते 5:30 या वेळेत पालकत्व कार्यशाळा (1-8 वर्ष), संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत खेळ आणि फिटनेस कार्यशाळा, तर दुपारी 4 ते 6 या वेळेत स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरीही नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने, कोरोनाचे नियम पाळून या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्या-

Aurangabad Gold: सोन्यानं झटकली मरगळ, दरात काहीशी वाढ, वाचा औरंगाबादचे दर काय?

Aurangabad: सौरऊर्जेवर वीज निर्मिती करा आणि विका, शेतकऱ्यांसाठी 5 ऑक्टोबरपर्यंत निविदा भरण्याची संधी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI