वाईन दुकानात तर येऊ द्या, मी स्वतः औरंगाबादची दुकानं फोडतो, खासदार इम्तियाज जलील यांचं ओपन चॅलेंज!

भाजप, काँग्रेस या निर्णयाविरोधात फक्त निंदा करतायत, मात्र आम्ही कृती करू. शहरात सरकारच्या नव्या धोरणानुसार, वाईनचं दुकान उघडलं तर मी स्वतः दुकान फोडणार, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

वाईन दुकानात तर येऊ द्या, मी स्वतः औरंगाबादची दुकानं फोडतो, खासदार इम्तियाज जलील यांचं ओपन चॅलेंज!
खासदार इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 2:26 PM

औरंगाबादः राज्यातील मॉल आणि सुपरमार्केटमध्येही (Wine in Mall and Supermarket) आता वाईन विकण्यास परवानगी असेल असा निर्णय राज्यमंत्री मंडळ्याच्या बैठकीत (Cabinet meeting) नुकताच घेण्यात आला. यावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर राज्यभरातून टीकेची झोड उठवली जात आहे. विशेषतः भाजपने या निर्णयावरून शिवसेना आणि सरकारला धारेवर धरलं आहे. काही काँग्रेस नेत्यांनीही या प्रकाराची निंदा केली आहे. यातच आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel)  यांनीही टोकाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या निर्णयाअंतर्गत औरंगाबादमध्ये ज्या दुकानात पहिल्यांदा वाईन येईल, ते दुकान मी स्वतः फोडणार, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

काय म्हणाले खासदार इम्तियाज जलील?

महाराष्ट्र सरकारने मंजुर केलेल्या नव्या वाईन विक्रीच्या धोरणाला खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र शब्दात विरोध केला आहे. तसेच यावेळी त्यांनी केवळ टीका न करता सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले, सरकारच्या या नियमानुसार, ज्या दुकानात आधी वाईन येईल, ते दुकानच आम्ही फोडणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्यासमोर मी ही कृती करणार. शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतालाय, असं समर्थन सरकारच्या वतीने करण्यात येतंय. मग चरस आणि गांजाही शेतातच येतात. त्यालाची परवानगी द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार जलील यांनी व्यक्त केली.

आया, बहिणींनाही आवाहन

खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारच्या या वाईन धोरणाविरोधात लढा देण्यास महिला वर्गालाही आवाहन केले आहे. आया बहिणींनी पुढे येऊन ही वाईनची दुकानं फोडली पाहिजेत, असेही खासदार जलील म्हणाले. भाजप, काँग्रेस या निर्णयाविरोधात फक्त निंदा करतायत, मात्र आम्ही कृती करू. शहरात सरकारच्या नव्या धोरणानुसार, वाईनचं दुकान उघडलं तर मी स्वतः दुकान फोडणार, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

इतर बातम्या-

INDvsWI: 25 वर्षाचा वेस्ट इंडिजचा ‘हा’ फलंदाज एकटाच मॅच फिरवू शकतो, पण भारत दौऱ्यात संघात स्थान नाही, कारण….

माझे भाषण संपताच व्हॉट्सअ‍ॅपवरून संपूर्ण उत्तर प्रदेशात पाठवा, जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.