AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त पायाला टिचकी मारली अन् मेलेलं बाळ पुन्हा जिवंत झालं; धुळ्यातील या घटनेची देशभरात जोरदार चर्चा

नंदुरबार धडगाव तालुक्यात एक अनोखा प्रकार घडला आहे. सध्या त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. माहेरी आलेल्या महिलेचे दोन महिन्यांचे बाल आजारी पडले, उलट्या आणि अति रडण्यामुळे ते निपचित पडलं होतं, काहीच हालचाल करत नव्हतं.

फक्त पायाला टिचकी मारली अन् मेलेलं बाळ पुन्हा जिवंत झालं; धुळ्यातील या घटनेची देशभरात जोरदार चर्चा
नंदुरबार धडगाव तालुक्यात एक अनोखा प्रकार घडलाImage Credit source: TV9
| Updated on: Mar 15, 2025 | 1:30 PM
Share

नंदुरबार धडगाव तालुक्यात एक अनोखा प्रकार घडला आहे. सध्या त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. माहेरी आलेल्या महिलेचे दोन महिन्यांचे बाल आजारी पडले, उलट्या आणि अति रडण्यामुळे ते निपचित पडलं होतं, काहीच हालचाल करत नव्हतं. अवघ्या दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याचे समजून कुटुंबियांनी आक्रोश सुरू केला. शोकाकुल वातावरणताच त्यांनी अंत्यसंस्कारांची तयारी केली. मात्र तेवढ्यात डॉक्टरांच्या रुपाने आलेल्या देवदूताने, त्यांच्या एका कृतीमुळे क्षणात सगळं वातावरण हसरं झालं. आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना माहिती मिळाली. त्यांनी रुग्णवाहिका पाठविली. स्वतःही जात वाटेतच रुग्णवाहिका थांबवून बाळाची तपासणी केली. आणि त्यांन त्या बाळाच्या पायाला छोटीशी टिचकी मारली. अन् त्या क्षणीच बाळाने श्वासोच्छ्वास सुरू केला. यामुळे मोठी खळबळ माजली असून सध्या सर्वत्र याच घटनेची चर्चा सुरू आहे.

नेमकं घडलं तरी काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथे राहणाऱ्या मिनाबाई सचिन पावरा ही महिला होळीसाठी आपल्या माहेरी सूर्यफूल गेली होती, त्यावेळी तिचं बाळ कुठलीही हालचाल करत नव्हता तर दोन्ही प्रयत्न होता, त्यामुळे परिवाराकडून राडाराडा सुरू झाली आणि अंत्यविधीची ही तयारीला सुरुवात झाली होती मात्र परिवारातील नातेवाईकांनी डॉक्टर गणेश तडवी यांना बोलावलं असता तडवी यांनी आपला अनुभव वापरत मुलाच्या पायाला टिचकी मारत मुलाचा श्वास घेत हालचाल करायला सुरुवात झाली त्यामुळे डॉक्टरांनी केलेला हा चमत्कार झाल्यानंतर परिवारासाठी डॉक्टर हा देवदूत बनला.

तेवढयात डॉक्टरांनी बाळाच्या पायाला टिचकी मारली आणि बाळ हालचाल करत श्वास घ्यायला लागलं. आणि सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू फुललं. बाळाला धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सलाईन लावल्यानंतर बाळ नियमित श्वास घ्यायला लागले. आता बाळाची प्रकृती ठणठणीत असून, दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या रुपाने देवदूतच आयुष्यात आला आणि बाळाला नवं जीवन देऊन गेला अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

डॉक्टरांनी काय सांगितलं ? 

पावरा परिवारासाठी आलेल्या डॉक्टर गणेश तडवी यांनी आपला अनुभव पणाला लावत बाळाचा जीव वाचवला.  उलट्या झासल्याने बाळाला  डीहायड्रेशन झालं होतं. बाळ जास्ती रडल्याने श्वास बंद झाला होता, मात्र नातेवाईकांनी आणि वेळेस मला कॉल केल्यानंतर मी पोचलो आणि परिस्थिती पाहता परिवाराला सांगितलं, की बाळाला रुग्णालयात जावा लागेल मात्र परिवार बाळाला आपल्या गावी घेऊन जाण्यासाठी सांगत होते, त्यामुळे मी त्या ठिकाणी उपचार सुरू केला आणि पायाला टिचक्या मारल्या त्यानंतर बाळ श्वास घ्यायला लागला आणि हालचाल करायला लागलं, असं डॉक्टरांनी सांगितलं.

बाळाला जीवनदान मिळाल्यानंतर परिवाराने डॉक्टरांचं कौतुक केलं. त्यानंतर डॉक्टरांनी एक दिवस त्या बाळाला सूर्यफूल या आरोग्य केंद्रात ठेवलं. त्यानंतर शहादा येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं असून बाळ आता सुखरूप आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.