AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलापूर, अंबरनाथमध्ये अनेक गावांना हादरे, घरांना तडे; नेमकं काय घडलं?

बदलापुरातील नवीन वडवली येथील घनकचरा प्रकल्पाच्या ब्लास्टिंगमुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. घरांना तडे गेले आहेत, आरोग्यावर परिणाम झाले आहेत. नागरिकांनी ब्लास्टिंग थांबविण्याची मागणी केली आहे आणि जर ते थांबवले नाही तर कचरा प्रकल्पाचे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.

बदलापूर, अंबरनाथमध्ये अनेक गावांना हादरे, घरांना तडे; नेमकं काय घडलं?
badlapur
| Updated on: Mar 24, 2025 | 8:34 PM
Share

बदलापुरातल्या नवीन वडवलीत घनकचरा प्रकल्पासाठी सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. ब्लास्टिंगमुळे नवीन वडवली, अंबरनाथ तसेच साई गावातील अनेक घरांना तडे गेले आहेत. यामुळे इथल्या रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे. हे ब्लास्टिंग तात्काळ न थांबवल्यास एकत्रित घनकचरा प्रकल्पाचं काम बंद पाडू, असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

बदलापूर नगरपालिका हद्दीतील नवीन वडवली या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून घनकचरा प्रकल्पाचं काम सुरू आहे. या ठिकाणी बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र या कचरा प्रकल्पाच्या नावाखाली इथला डोंगर फोडण्यात येत आहे. त्यासाठी दिवस-रात्र ब्लास्टिंगचं काम केलं जात आहे. जवळपास ६ इंच बोअरवेल मारून हे ब्लास्टिंग करण्यात येतं.

या कामाचा नाहक त्रास नवीन वडवली, नवीन अंबरनाथ तसेच साई गावातल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे गेले आहेत. तसेच अनेक लहान मुलं रात्री दचकून जागी होतात. त्यासोबतच विद्यार्थ्यांना अभ्यास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. घरात धूळ येत असल्याने अनेकांना श्वसनाचे आजार देखील झाले आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

तिन्ही गावांमध्ये भीतीचं वातावरण

सध्या नवीन वडवली, नवीन अंबरनाथ तसेच साई या तिन्ही गावांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. या कामसाठी सुरु असलेले हे ब्लास्टिंग तात्काळ न थांबवल्यास कचरा प्रकल्पाचं काम पूर्णपणे बंद पाडू, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा प्रकल्प उभारला जात आहे. इथे ब्लास्ट होतात. आमच्या घरांना हादरे बसतात. मुलं दचकून उठतात. याबद्दल शासनाला वारंवार तक्रार करुन अर्ज करुनही ते काहीही दखल घेत नाही. याबद्दल आम्ही महिला आंदोलन करणार आहोत. आम्हाला धुराचा त्रास होतोय. सर्दी-खोकला, जुलाब याचाही त्रास होत आहे. सरकारने याची तात्काळ दखल घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया स्थानिक महिलांनी दिली आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.