बागेश्वर बाबा सिद्धी विनायक चरणी, सोबत महाराष्ट्रातील बडे नेते, पुढचा दौरा कुठे?

बागेश्वर बाबा यांचा मुंबईतला मीरारोड येथील कार्यक्रम प्रचंड उत्साहात पार पडल्यानंतर आज ते मुंबईतील प्रसिद्ध देवस्थानांचं दर्शन घेत आहेत. आज ते सिद्धीविमानयक मंदिरात पोहोचले.

बागेश्वर बाबा सिद्धी विनायक चरणी, सोबत महाराष्ट्रातील बडे नेते, पुढचा दौरा कुठे?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 4:25 PM

मुंबई : बागेश्वर धाम (Bageshwar Dham) येथील धीरेंद्र शास्त्री (Dhrirendra Shashtri) उर्फ बागेश्वर बाबा यांचा महाराष्ट्र दौरा सध्या जोरदार चर्चेत आहे. धीरेंद्र शास्त्रींच्या दौऱ्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मीरा रोड येथे बागेश्वर बाबा यांच्या सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शनिवार आणि रविवारी हा कार्यक्रम झाल्यानंतर आज बागेश्वर बाबा मुंबईतील प्रसिद्ध देवस्थानाच्या दर्शनाला निघाले. मुंबईकरांचं आराध्य दैव असलेल्या मुंबादेवी आणि सिद्धिविनायकाचं दर्शन बागेश्वर बाबा यांनी घेतलं. यावेळी महाराष्ट्रातील बडे नेते बागेश्वर धाम यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी आमदार रविराणा, खासदार मनोज तिवारी, आमदार सदा सरवणकर, आमदार गीता जैन आदी नेते उपस्थित होते.

लवकरच अमरावती दौरा?

बागेश्वर बाबा यांचा महाराष्ट्रातील हा दुसरा दौरा आहे. मुंबईनंतर ते लवकरच अमरावती येथे जाण्याची शक्यता आहे. अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या संकल्पनेतून प्रभू श्री हनुमानाची भव्य मूर्ती उभारली जात आहे. ही मूर्ती तब्बल १११ फुट उंचीची पूर्णाकृती मूर्ती असेल. धीरेंद्र शास्त्री यांच्या हस्ते मूर्तीचा शिलान्यास केला जाईल, असे म्हटले जातेय. या करिता आज रवी राणा यांनी धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली.

Ravi Rana

हनुमान भक्त

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची हनुमान भक्ती अवघ्या महाराष्ट्रात परिचित आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांना हनुमान चालिसावरून या दाम्पत्याने आव्हान दिलं होतं. राणा दाम्पत्याच्या आक्रमक आंदोलनानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राणा दाम्पत्याने हनुमान चालिसावरून अक्षरशः कोंडीत पकडलं होतं. तर दुसरीकडे धीरेंद्र शास्त्री हेदेखील मोठे हनुमान भक्त असल्याचा दावा करतात. बजरंगबलीच्या कृपेमुळे आपण अनेक चमत्कार करू शकतो, असे ते त्यांच्या सत्संगांतून सांगत असतात. त्यामुळेच अमरावती येथील १११ फुटी पूर्णाकृती हनुमान मूर्तीच्या शिलान्यासासाठी राणा दाम्पत्याने बागेश्वर बाबांना आमंत्रित केल्याचं दिसून येतंय .

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.