सर्वात मोठी बातमी | संजय राऊत यांचं हक्कभंग नोटीसीला उत्तर, म्हणाले, मी विधीमंडळाचा अवमान केला नाही!

विधिमंडळ नव्हे चोरमंडळ या राऊत यांच्या वक्तव्यावरून नेमकी काय कारवाई होते, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. या वक्तव्यावरून दिलेल्या हक्कभंग नोटिशीला संजय राऊत यांनी आज सविस्तर उत्तर दिलंय.

सर्वात मोठी बातमी | संजय राऊत यांचं हक्कभंग नोटीसीला उत्तर, म्हणाले, मी विधीमंडळाचा अवमान केला नाही!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 3:34 PM

मुंबई : विधिमंडळ नव्हे हे चोरमंडळ आहे, या वक्तव्यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांना हक्कभंगविषयक (right voilation) नोटीस देण्यात आली होती. १ मार्च रोजी कोल्हापुरात संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं होतं. यावरून हक्कभंग समितीतर्फे नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसीला राऊत यांनी अखेर उत्तर दिलंय. मी विधिमंडळाचा अवमान होईल, असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, माझं वक्तव्य तपासून पहा असं राऊत यांनी उत्तरात ठामपणे सांगितलंय. हक्कभंग समितीने गेल्या आठवड्यात संजय राऊत यांना दुसरी नोटीस दिली होती. सात दिवसांच्या आत उत्तर देण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर राऊत यांनी हे उत्तर दिलय.

संजय राऊत यांचं उत्तर काय?

संजय राऊत यांनी नोटिशीला दिलेल्या उत्तरात म्हटलंय, माझ्यावर हक्कभंग आणलेल्यांनाच हक्कभंग समितीत घेण्यात आलंय. समितीतील सदस्यांवर अपात्रतेची टांगली तलवार आहे. आम्हाला सर्व पदं मा. बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. त्यांनी शिवसेना निर्माण केली. त्यामुळे सध्या विधिमंडळात डुप्लिकेट शिवसेना आहे. त्यामुळे हा गट विधिमंडळ नसून चोरमंडळ आहे, असं कोल्हापुरातील १ मार्चच्या वक्तव्यात मी म्हटलं. फुटीर गटापुरताच तो उल्लेख आहे, असं उत्तर संजय राऊत यांनी पत्रात म्हटलंय.

चोरमंडळातील सदस्यांवर सुप्रीम कोर्टात खटला सुरु आहे. यापैकीच काहीजण हक्कभंग समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निकालानंतरच हक्कभंग समिती कारवाई करू शकेल. विधिमंडळाचं हसं होऊ नये म्हणूनच मी हे परखड मत मांडलं. बाकी विधिमंडळात कोणत्याही चोरमंडळाला स्थान असून नये, ही लोकशाहीची परंपरा आहे. मी त्या परंपरेचा पालन करणारा एक नागरिक आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना माझ्याविरोधात डाव आखल्याचा आरोप राऊत यांनी केलाय.

अन्य एका प्रकऱणात गुन्हा दाखल

संजय राऊत यांना चोरमंडळ वक्तव्यावरून हक्कभंग कारवाईला सामोरे जावे लागतेय की काय, यावरून राजकीय चर्चांना उधाण आलय. तोच दुसरीकडे राऊत यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. बार्शी येथील अल्पवयीन मुलीवर हल्ला प्रकरणात भाजप पुरस्कृत गुंडांचा हात असल्याचा आरोप करत राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. यातील पीडिता अल्पवयीन असून राऊत यांनी तिचा फोटो ट्विट केल्याने तिची ओळख उघड झाली. यावरून बार्शी पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.