AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Balasaheb Thorat : आता लक्ष्य 2024; देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणू : बाळासाहेब थोरात

काँग्रेसची विचारधारेलाच संपवण्याचे काम पद्धतशीरपणे केले जात आहे. हे हल्ले परतवण्यासाठी काँग्रेसच्या विचारधारेला माननारे निष्ठावान कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. सर्वात महत्वाची विचारधारा आहे, ती रुजली पाहिजे. काँग्रेस पक्ष संघटन बळकट करण्यावर भर देतं आणि एक दिवस पुन्हा काँग्रेसचीच सत्ता देशात व राज्यात येईल यासाठी प्रयत्न करुया. आता आपले लक्ष्य हे 2024 असेल.

Balasaheb Thorat : आता लक्ष्य 2024; देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणू : बाळासाहेब थोरात
विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरातImage Credit source: tv9
| Updated on: May 23, 2022 | 8:15 PM
Share

मुंबई : देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूनकीत काँग्रेसचा (Congress) सुपडासाफ झाला. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या निराशा पसरली आहे. तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये हमरी तुमरी माजली आहे. याच दरम्यान काँग्रेसमध्ये जीव फुंकण्याचे काम उदयपूरच्या नवसंकल्प शिबिरात झाले. त्याच नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दोन दिवसांचे राज्यस्तरीय शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. याची माहिती आज पक्ष प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली. त्यावेळी काँग्रेसची विचारधारेलाच संपवण्याचे काम पद्धतशीरपणे केले जात असल्याचा विरोधकांवर हल्ला विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Legislative Party Leader and Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी केला. तसेच ते म्हणाले, आता काँग्रेस पक्षाचे लक्ष्य 2024 आहे. तर देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार (Congress Government) आणू असेही त्यांनी म्हटले आहे. टिळक भवन येथे पक्षप्रभारी एच. के. पाटील, प्रदेश निवडणूक अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विस्तारीत कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी थोरात बोलत होते.

काँग्रेसची विचारधारेलाच संपवण्याचे काम

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दोन दिवसांचे राज्यस्तरीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. 1 व 2 जून रोजी शिर्डी येथे हे शिबीर होणार आहे. या शिबिराला राज्यातील मंत्री, सर्व जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील. तर उदयपूरच्या नवसंकल्प शिबिरातील सर्व मुद्दे राज्यातील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवले जातील, अशी माहिती पक्ष प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली. त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, सध्या देशातील वातावरण बदलेले आहे. संविधानावर घाला घातला जात आहे. तसेच काँग्रेसची विचारधारेलाच संपवण्याचे काम पद्धतशीरपणे केले जात आहे. हे हल्ले परतवण्यासाठी काँग्रेसच्या विचारधारेला माननारे निष्ठावान कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. सर्वात महत्वाची विचारधारा आहे, ती रुजली पाहिजे. काँग्रेस पक्ष संघटन बळकट करण्यावर भर देतं आणि एक दिवस पुन्हा काँग्रेसचीच सत्ता देशात व राज्यात येईल यासाठी प्रयत्न करुया. आता आपले लक्ष्य हे 2024 असेल.

9 ते 14 जून दरम्यान जिल्हास्तरीय शिबीर

यावेळी मार्गदर्शन करताना एच. के. पाटील म्हणाले की, राज्यस्तरीय शिबिरानंतर 9 ते 14 जून दरम्यान जिल्हास्तरीय शिबीर आयोजित करण्यात येईल. या शिबिराला मंत्री व राज्यातील जेष्ठ नेतेही उपस्थित राहतील. पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच काँग्रेस पक्षाला राज्यात पुन्हा उभारी देण्यावरही भर दिला जाईल असेही ते म्हणाले. तर यावेळी स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्टदरम्यान 75 किमीची ‘आझादी गौरव पदयात्रा’काढण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. उदयपूर घोषणापत्रातील एक व्यक्ती, एक पद, या मुद्द्यासह इतर सर्व मुद्द्यांची राज्यात अंमलबजावणी केली जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

केंद्रातील मोदी सरकारची पोलखोल काँग्रेस पक्ष करणार

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, उदयपूरच्या नवसंकल्प शिबिराच्या घोषणापत्राची अंमलबजावणी करतानाच केंद्रातील मोदी सरकारने 8 वर्षापासून सुरु केलेल्या कारभाराची पोलखोल काँग्रेस पक्ष करणार आहे. भाजपा सरकारच्या काळात वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर भाजपा कशी अपयशी ठरली ते जनेतपर्यंत पोहोचवण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. केंद्रातील भाजपा सरकारचा दृष्टीकोन हा केवळ व्यापारी राहिलेला आहे त्यातून काँग्रेसने उभे केलेले सर्व काही विकून खाजगीकरण केले जात आहे. लोकशाही व संविधान व्यवस्था धोक्यात आणलेली आहे. याविरोधात काँग्रेस पक्ष आवाज उठवणार असून ब्रिटिशांविरोधात लढलो तसेच आता या भाजपाविरोधात काँग्रेस कार्यर्त्यांना लढावे लागणार आहे.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, डॉ. विश्वजित कदम, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....