भरगच्च कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर बाळासाहेब थोरात पॉझिटिव्ह, फडणवीसांनी वापरलेल्या हेलिकॉप्टरमधूनही प्रवास!

कुणाल जायकर

कुणाल जायकर | Edited By: मंजिरी धर्माधिकारी, Tv9 मराठी

Updated on: Dec 31, 2021 | 4:54 PM

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र अहवाल येण्यापूर्वी ते अहमदनगरमधील अनेक कार्यक्रमांना उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतली. त्यामुळे आता अनेकांना कोरोनाची चिंता सातवत आहे.

भरगच्च कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर बाळासाहेब थोरात पॉझिटिव्ह, फडणवीसांनी वापरलेल्या हेलिकॉप्टरमधूनही प्रवास!

अहमदनगर:  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे बुधवारी नगरमध्ये आले होते. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय यांच्या लग्नासाठी हेलिकॉप्टरने फडणवीस आणि पाटील आले. मात्र, ते ज्या हेलिकॉप्टरने आले, त्याच हेलिकॉप्टरने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. थोरात आणि फडणवीस यांची हेलिपॅडवर भेटही झाली. तसेच या दोघांमध्ये काही क्षण चर्चाही झाली. मात्र याच भेटीच्या दुसऱ्या दिवशी बाळासाहेब थोरतांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली टेस्ट करून घ्यावी अस अहवान त्यांनी सोशल मीडियावर केलय.

कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी थोरात अनेक कार्यक्रमांत

थोरतांचा कोरोना रिपोर्ट येण्याआधी त्यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावलीय. बुधवार दिनांक 29 तारखेला बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच उदघाटन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होतेय. त्यानंतर त्यांनी कर्डीले यांच्या मुलाच्या लग्नाला निमित्त घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, काँग्रेस आमदार लहू कानडे उपस्थित होते.

किर्डिलेंच्या विवाहसोहळ्यात अनेक नेते

तर माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले याच्या विवाहासाठी भाजपचे अनेक नेते नगरमध्ये आले होते. या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या दोन दिग्गज नेते पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडालीये. भाजप नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यां दोघांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन हे हेलिकॉप्टरने नगरमध्ये आले. हे हेलिकॉप्टर पोलिस परेड मैदानावर उतरताच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे हेलिकॉप्टरच्या दिशेने गेले. मात्र अवघ्या काही क्षण थोरात यांनी फडणवीस, पाटील आणि महाजन यांची भेट घेऊन चर्चा केली, व त्याच हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र त्यांनी कार्यक्रमांना लावलेली हजेरी आणि त्यानंतर कोरोनाचा आलेला रिपोर्ट यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे.

इतर बातम्या-

आम्हाला भाजपचा मुख्यमंत्रीय हवाय, लगान टीम नकोय; नारायण राणेंचं मोठं विधान

‘राजन तेली यांची मोठी मेहनत, खचू नका, जोमानं कामाला लागा ‘, देवेंद्र फडणवीसांचा सल्ला


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI