AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या घरी जीन आहेत…घरी खड्डे खणून ठेवा…भोंदू बाबांच्या नादी लागले अन् मुलगा गमावला; आर्वीत नेमकं काय घडलं?

आर्वी पोलिसांनी बाबासह त्याच्या दोन्ही मुलावर कलम 302,201,34 भा.दं.वि सह कलम 3 महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

तुमच्या घरी जीन आहेत...घरी खड्डे खणून ठेवा...भोंदू बाबांच्या नादी लागले अन् मुलगा गमावला; आर्वीत नेमकं काय घडलं?
वर्ध्यात तंंत्राने मुलाला बरे करतो म्हणून सांगत मुलाचा घेतला बळीImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 20, 2022 | 5:44 PM
Share

वर्धाः अमरावतीचे (Amravati) गणेश तुकाराम सोनकुसरे यांचा मुलगा आजारी होता म्हणून त्यांनी रुग्णालयात दाखल केल पण मुलाची तब्बेच काही बरी झाली नाही. म्हणून मग मुलाला लवकर बरं करण्यासाठी त्यांनी आणखी कोणी चांगले डॉक्टर आहेत याची शोधाशोध घ्यायला सुरु केली. मात्र तेवढ्या काळात त्यांना एका मांत्रीक (Balck Magic) बाबाचा नंबर मिळाला. त्यांनी त्यांच्याशी संपर्क करुन मुलगा आजारी असल्याचे त्यांना सांगितले. त्या भोंदूबाबानेही त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेत आजारी मुलाच्या (Son Death) वडिलांना बरे करण्याची आशा दाखवत त्यांना सांगितले की, तुमच्या घरी जीन आहेत… घरी खड्डे खणून ठेवा…पूजा तंत्रमंत्र उच्चारून बंदोबस्त करून देतो असे सांगत भोंदू बाबाने मुलाच्या वडिलांना पूजेचे साहित्य आणायला पाठविलं.

भोंदूबाबाने त्यानंतर शनिवारी हा विधी करू असे म्हणत सोनकुसरे यांच्या मुलाला ते आर्वीला घेऊन गेले. मुलाला घेऊन गेले म्हणून मुलगा बरा होऊन घरी येईल अशीच घरातील मंडळींना आशा लागून राहिली. मात्र घेऊन गेल्याच्या दुसऱ्या दिवशी फोन खणखणला आणि भोंदू बाबानं मुलगा गेल्याचं सांगितले.

आपला मुलगा गेला कसा

ज्या आई वडिलांचा मुलगा गेला ते दुःखात असतानाही आणि आपला मुलगा गेला कसा हे वारंवार विचारूनही बाबा मात्र तो गेल्याची घटना कशी घडली ते सांगतच नव्हता. त्यामुळे भोंदूबाबाच्या त्याच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता त्यांनी आपल्या मुलाला बारकाव्याने पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आले की, मुलाच्या गळ्यावर जखमा दिसत आहेत. मुलाच्या शरीरावर जखमा दिसल्यानंतर मात्र त्यांनी पोलिसांची मदत घेत त्या भोंदूबाबा अब्दुल रहीम अब्दुल मजीद, अब्दुल जुनैद अब्दुल रहिम, अब्दुल जमीर अब्दुल रहिम या सगळ्यांवर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

तंत्रमंत्रांनी उपचार करायला गेले

मुलगा आजारी, डॉक्टरांकडून उपचार करुनही काही फरक पडला नाही म्हणून तंत्रमंत्रांनी उपचार करायला गेले अन् त्या भोंदूबाबानच मुलाचा जीव घेतला. यामध्ये मृत झालेल्या मुलाचे नाव आहे ऋतिक गणेश सोनकुसरे. तर त्याचा जीव घेणाऱ्यांची नावं आहेत, अब्दुल रहीम अब्दुल मजीद, अब्दुल जुनैद अब्दुल रहीम, अब्दुल जमीर अब्दुल रहीम हे सगळे राहणार विठ्ठल वॉर्डमधील आहेत. मुलाच्या मृत्यूप्रकरणी आता वडील गणेश तुकाराम सोनकुसरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

जादूटोणा प्रतिबंध अधिनियम

याप्रकरणी आर्वी पोलिसांनी त्या बाबासह त्याच्या दोन्ही मुलावर कलम 302,201,34 भा.दं.वि सह कलम 3 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. कायदा करूनही तंत्रमंत्रांवर विश्वास ठेवून अनिष्ठ प्रकारांना बळी पडण्याचे प्रकार नवे नाहीत,त्यातही आर्वीमध्ये ज्या प्रकारे हा प्रकार घडला आहे ती एक प्रकारची युवकाची हत्याच केली गेली आहे. सध्या पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी असे प्रकार थांबवण्यासाठी जनजागृती होणेही तितकचं गरजेचं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.