AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्हाला स्वतंत्र 9 टक्के आरक्षण द्या, राज्यातील बारा बलुतेदार समाजाची पालकमंत्र्यांकडे मागणी

बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मेटकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी गुलाबराव पाटील यांना साकडे घातले आहे.  (Bara Balutedar Community demand 9 percent Reservation) 

आम्हाला स्वतंत्र 9 टक्के आरक्षण द्या, राज्यातील बारा बलुतेदार समाजाची पालकमंत्र्यांकडे मागणी
| Updated on: Nov 01, 2020 | 10:48 AM
Share

जळगाव : राज्यातील बारा बलुतेदारांसाठी राष्ट्रसंत  गाडगेबाबा यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन 500 कोटींचा निधी देण्यात यावा. तसेच या समाजाला स्वतंत्र 9 टक्के आरक्षण लागू करावे, अशी मागणी मायक्रो ओबीसी समाजाचे प्रतिनिधी आणि जळगाव जिल्हा बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच रोहिणी आयोग लागू करावा आणि मराठा आरक्षणामुळे प्रभावित झालेल्या प्रक्रिया पुन्हा सुरु व्हाव्यात, अशीही मागणी त्यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. (Bara Balutedar Community demand 9 percent Reservation)

राज्यातील ओबीसींच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 10 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची पाच सदस्यांची उपसमिती स्थापन केली होती. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे या समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाचे प्रदेशाध्यक्ष जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मेटकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी गुलाबराव पाटील यांना साकडे घातले आहे.

राज्यातील बारा बलुतेदारांसाठी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करत त्यांना 500 कोटींचा निधी द्यावा. रोहिणी आयोग लागू करावा आणि मराठा आरक्षणामुळे प्रभावित झालेल्या प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु करावी, यांसह अनेक मागण्यांचे निवदेन या पदाधिकाऱ्यांनी गुलाबराव पाटील यांना दिले.

राज्यातील बारा बलुतेदार समाजाला स्वतंत्र 9 टक्के आरक्षण लागू करावे. त्याशिवाय मराठा आरक्षण देताना ओबीसींच्या मूळ आरक्षणाला धक्का लावू नये. एमपीएससी परीक्षा तत्काळ घेण्यात याव्यात. मराठा आरक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया आणि नोकर भरती थांबवू नये, असेही त्यांनी यावेळी म्हटलं. (Bara Balutedar Community demand 9 percent Reservation)

संबंधित बातम्या : 

विजय वडेट्टीवारांची हकालपट्टी करा, नोकरभरतीच्या मुद्द्यावरुन मराठा मोर्चा आक्रमक

बंजारा समाजाचे धर्मगुरु रामराव महाराजांवर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार; पोहरादेवीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.