AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baramati: ट्रकने दुचाकीला चिरडले; पती-पत्ती जागीच ठार, चालक फरार!

अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील लोंढे दाम्पत्य जागीच ठार झाले. या घटनेनंतर चालक आणि क्लिनर फरार झाले आहेत. त्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

Baramati: ट्रकने दुचाकीला चिरडले; पती-पत्ती जागीच ठार, चालक फरार!
संग्रहित छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 3:25 PM
Share

बारामतीः ट्रकचालकाने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना बारामतीमध्ये घडली आहे. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले असून, अपघातानंतर ट्रकचालक आणि क्लिनर फरार झाले आहेत. काळूराम गणपत लोंढे आणि शाकूबाई काळूराम लोंढे अशी मृतांची नावे आहेत.

बारामतीमध्ये घडलेल्या या अतिशय भीषण अशा घटनेची सविस्तर माहिती अशी की, बारामती – पाटस रस्त्यावरील सोनवडी सुपे फाट्यावर काळूराम गणपती लोंढे हे आपली पत्नी शाकूराम लोंढे यांच्याबरोबर दुचाकीवरून जात होते. साधारणतः सकाळी सव्वाअकराच्या सुमारास एक मालट्रक (क्रमांक एम. एच. 18 बी. जी. 0814 ) हा पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने जात होता. याचवेळेस लोंढे हे दुचाकीवरून ( एम. एच 42 बी. सी. 8234) बारामतीच्या दिशेने निघाले होते. मात्र, ऐनवेळी ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. त्याने दुचाकीवरील लोंढे दाम्पत्याला चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील लोंढे दाम्पत्य जागीच ठार झाले. या घटनेनंतर चालक आणि क्लिनर फरार झाले आहेत. त्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

भीषण अपघाताची पुनरावृत्ती

इंदापूर तालुक्यात गेल्याच महिन्याच भीषण अपघात झाला होता. त्यात भवानीनगर येथील छत्रपती साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची आणि बारामतीच्या दिशेने येणाऱ्या इनोव्हा कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा चिरडून मृत्यू झाला. बारामती-इंदापूर रस्त्यावरील खारा ओढ्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टरचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. त्याखाली ट्रॅक्टर चालकाचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर इनोव्हा कारमधील एअर बॅग उघडल्या गेल्याने आणखी मोठा अनर्थ टळला आहे. इनोव्हा कारमधील प्रवासी जखमी झाले. आज गुरुवारी याच अपघाताची पुनरावृत्ती झाली, अशी चर्चा सुरू होती.

तर वाचला असता जीव

अपघातामध्ये मृत झालेल्या दाम्पत्याने हेल्मेट घातले नसल्याचे समजते. ट्रक चालकाने वेग नियंत्रणात ठेवला असता आणि त्याने मर्यादित वेगात वाहन चालवले असते, तर ते नक्कीच नियंत्रणाबाहेर गेले नसते. त्यामुळे कदाचित हा अपघातही घडला नसता, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातल्या या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

इतर बातम्याः

पुण्याच्या विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारणार, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती, जागेची केली पाहणी

Nashik: पोलीस आयुक्तांच्या मोहिमेला पोलिसांचाच हरताळ, हेल्मटसक्तीचा बडगा फक्त सामान्यांवर, नाशिककरांमध्ये तीव्र रोष!

Malegaon Violence: रझा अकादमीवरील छापेमारीत महत्त्वाचे पुरावे हाती, 52 जणांना बेड्या!

Follow Us
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.