युतीच्या घोषणेपूर्वीच शिवसेनेच्या दिलीप सोपलांनी प्रचाराचा नारळ फोडला

बार्शी विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे उमेदवार म्हणून दिलीप सोपल (Shivsena Dilip Sopal) यांनी प्रचाराचा नारळ फोडला. विशेष म्हणजे सोपलांनी राष्ट्रवादीला (NCP) रामराम करत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळून येईल, अशी भीती वर्तवणारे शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकरांनी (Bhausaheb Andhalkar) सोपलांना जाहीर पाठिंबा दिला.

युतीच्या घोषणेपूर्वीच शिवसेनेच्या दिलीप सोपलांनी प्रचाराचा नारळ फोडला

सोलापूर : भाजप आणि शिवसेना युतीच्या जागावाटपाबाबत (BJP-Shivsena Alliance) अजूनही काही ठोस असा निर्णय झालेला नाही. मात्र, इकडे सोलापूरच्या बार्शीत (Barshi Vidhan Sabha Constituency) काही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे उमेदवार म्हणून दिलीप सोपल (Shivsena Dilip Sopal) यांनी प्रचाराचा नारळ फोडला. विशेष म्हणजे सोपलांनी राष्ट्रवादीला (NCP) रामराम करत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळून येईल, अशी भीती वर्तवणारे शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकरांनी (Bhausaheb Andhalkar) सोपलांना जाहीर पाठिंबा दिला. इतकंच नाही तर सोपलांनी प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला शुभारंभ करावा असा आग्रहही धरला (Dilip Sopal stars campaigning).

शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर दहा वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना बार्शीच्या तळागाळात रुजविण्याचे काम आंधळकर यांनी केलं. यंदाच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी जाहीर होईल असं वाटत असतानाच राष्ठ्रवादीच्या दिलीप सोपलांनी थेट मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधून घेतलं. सोपलांच्या राष्ट्रवादी सोडल्याने बार्शीत राष्ट्रवादीला खिंडार पडलं, तर शिवसेनेतही अंतर्गत वाद उफाळून आला. थेट बंडाची भाषा करण्यात आली. यासर्वांमध्ये भाऊसाहेब आंधळकर हे आघाडीवर होते. मात्र, त्याच आंधळकरांनी आता थेट दिलीप सोपलांच्या मागे राहू, असं सांगत प्रचाराचा नारळ फोडण्याचा आग्रह केला आणि सोपलांनी तो पूर्णही केला.

राज्यात शिवसेना आणि भाजप युती मधील जागा वाटपाची अजून निर्णायक बोलणी झाली नाही. मात्र, इकडे सोपलांनी प्रचाराचा नारळ फोडला, तो आंधळकरामुळेच. बार्शीत दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील वाद थांबता थांबत नाही. नगरपरिषद निवडणुकीनंतर राजेंद्र राऊतांनी शिवसेनेला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी सुद्धा मतदार संघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याचं राऊत सांगत आहेत. मात्र, त्यांच्याआधीच राजेंद्र राऊत यांचे कट्टर राजकीय विरोधक दिलीप सोपल आणि भाऊसाहेब आंधळकरांनी बाजी मारली आहे. मात्र, दिलीप सोपलांना पाठिंबा देताना भाऊसाहेबांनी मी पक्ष सोडला, तर मला जेलमध्ये जाऊन बसावं लागेल, अशी कबुली दिली.

घाईगडबडीत का होईना दिलीप सोपलांनी प्रचाराचा नारळ वाढविला खरा, मात्र भाजपच्या राजेंद्र राऊत यांचं काय होईल? ऐनवेळी राष्ट्रवादीच्या जहाजातून उडी मारून शिवसेनेचे धनुष्य हाथी घेणाऱ्या सोपलांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे सुप्रीमो काय आखणी करतात? हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, सध्या तरी सोपलांनी प्रचाराचा नारळ फोडून तेच उमेदवार असतील हे जाहीर केलं आहे.

संंबंधित बातम्या :

शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा भाजपच्या वाटेवर?

एमआयएमची उमेदवार यादी जाहीर, ‘वंचित’सोबतच्या आघाडीवर प्रश्नचिन्ह कायम

मुख्यमंत्र्यांविरोधात बाहेरचा उमेदवार दिल्यास परतवून लावू, नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षाला इशारा

सिंधुदुर्गातील नेत्यासाठी नाणारचा खटाटोप : खासदार विनायक राऊत

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *