मुख्यमंत्र्यांविरोधात बाहेरचा उमेदवार दिल्यास परतवून लावू, नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षाला इशारा

मुख्यमंत्र्यांविरोधात बाहेरचा उमेदवार दिल्यास परतवून लावू, नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षाला इशारा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारख्या जाहीर झाल्या, आचारसंहिताही लागू झाली. त्यामुळे आता सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच काँग्रेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या दक्षिण-पश्चिम (Nagpur South Waste Vidhan sabha) मतदारसंघातून दमदार उमेदवार उतरवणार असल्याचं जाहीर केलं.

Nupur Chilkulwar

|

Sep 22, 2019 | 6:27 PM

नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारख्या जाहीर झाल्या, आचारसंहिताही लागू झाली. त्यामुळे आता सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच काँग्रेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या दक्षिण-पश्चिम (Nagpur South-West Vidhan sabha) मतदारसंघातून दमदार उमेदवार उतरवणार असल्याचं जाहीर केलं. तो उमेदवार कोण असेल यावर सध्यातरी शिक्कामोर्तब झालेला नाही. मात्र, काँग्रेसचा उमेदवार ठरवण्याआधीच तो उमेदवार बाहेरचा नसावा (Candidate against CM should not be outsider), असा थेट इशारा कार्यकर्त्यांनी दिला. त्यामुळे नागपूर काँग्रेसचं अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आलं आहे.

नागपुरात (Nagpur Assembly Constituency) मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दमदार उमेदवार दिला जाईल, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं. मात्र, हा दमदार उमेदवार नागपूर शहराबाहेरचा नसावा, शहराबाहेरचा उमेदवार दिल्यास त्याला परतवून लावू, असा पवित्रा काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे या मुद्यावरुन काँग्रेसमधील अंतर्गत वाद चिघळण्याची शक्यता आहे.

नागपुरातील दक्षिण-पश्चिम हा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. या मतदार संघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस दमदार उमेदवार उतरवणार असल्याची चर्चा सध्या नागपुरात आहे. मात्र, हा दमदार उमेदवार कोण, असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत. तर बाहेरचा उमेदवार नागपुरात आणल्यास त्याचा विरोध करणार असल्याचं निवेदन कार्यकर्ते आणि नगर सेवकांनी काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना दिलं. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये पक्षाबाबत नाराजी दिसून आली.

कार्यकर्त्यांच्या या मागणीला शहर अध्यक्षांनीही पाठिंबा दर्शविला आणि दक्षिण-पश्चिम या मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात नाही, तर शहरातील कुठल्याही मतदारसंघात बाहेरचा उमेदवार पक्ष श्रेष्ठींनीं लादला, तर त्याला परतवून लावू असा इशारा शहर अध्यक्षांनी दिला.

नागपुरातील दक्षिण-पश्चिम हा हाय प्रोफाइल मतदारसंघ असून काँग्रेसची लढत मुख्यमंत्र्यांसोबत आहे. मात्र, या ठिकाणी जर काँग्रेसने बाहेरचा उमेदवार आणला, तर कार्यकर्तेच काँग्रेसविरोधात जातील आणि लढाईआधीच मुख्यमंत्र्यांचा विजय होईल, असं चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे आता काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करणार, मुख्यमंत्र्यांविरोधात कुठला उमेदवार उभा करणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

विधानसभा निवडणूक 2014 चा निकाल

  • देवेंद्र फडणवीस     भाजप         1,13,918 मतं   (58,945 मतांनी विजयी)
  • प्रफुल्ल गुडधे         काँग्रेस         54,973   मतं
  • राजेंद्र पडोळे         बसप          16,540   मतं

संबंधित बातम्या :

नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण?

पक्ष कुठलाही असो, आम्हाला तिकीट हवं, इच्छुकांची उमेदवारीसाठी मुंबईवारी

एकनाथ खडसेंना पुढच्या मंत्रिमंडळात पाहण्याची इच्छा : पंकजा मुंडे

शिवसेनेत पैसे घेऊन मंत्री, आमदार, महापौर केलं जातं : नारायण राणे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें