नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसला (Congress) उमेदवारच मिळत नसल्याचं चित्र आहे.

नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण?

नागपूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसला (Congress) उमेदवारच मिळत नसल्याचं चित्र आहे. काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे (Vikas Thakare) यांनी पराभवाच्या भीतीने दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून (Nagpur Assembly Constituency) निवडणूक लढण्यास पक्षश्रेष्ठींना नकार दिल्याचं बोललं जात आहे. तर मागील विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार असलेल्या प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी पश्चिम नागपूरमधून उमेदवारी मागितली आहे.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. परंतु आशिष देशमुख यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातून (Katol Assembly Constituency) विधानसभेची उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? हा मोठा प्रश्न आहे. 2014 मध्ये उमेदवार असलेल्या प्रफुल्ल गुडधेंनी तर यावेळी काँग्रेसची उमेदवारीही मागितली नाही.

असं असलं तरी काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सरप्राईज चेहरा देईल, असा दावा प्रफुल्ल गुडधे यांनी केला आहे. सध्यातरी माजी आमदार आशिष देशमुख यांना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसने विचारणा केल्याची चर्चा आहे.

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ (Nagpur South Waste Vidhan sabha)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा मतदारसंघ. देवेंद्र फडणवीस यांनी दोन निवडणुका या मतदारसंघातून जिंकल्या आहेत. त्यामुळे यावेळी दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून हॅटट्रिक करण्यासाठी ते सज्ज आहेत. भाजपचा बालेकिल्ला म्हणूनच या मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघातून पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच निवडणूक लढवतील यात शंका नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं मताधिक्य वाढवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न असतील.

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 2014 ला काँग्रेसकडून प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी निवडणूक लढवली होती. यंदाही त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. पण त्यांच्यासोबतच काँग्रेसमध्ये इच्छुकांचीही मोठी लिस्ट आहे. त्यामुळेच भाजपच्या बालेकिल्ल्यात गटबाजी टाळण्याचं मोठं आव्हान काँग्रेससमोर आहे.

विधानसभा निवडणूक 2014 चा निकाल

  • देवेंद्र फडणवीस     भाजप         1,13,918 मतं   (58,945 मतांनी विजयी)
  • प्रफुल्ल गुडधे         काँग्रेस         54,973   मतं
  • राजेंद्र पडोळे         बसप          16,540   मतं


Published On - 12:54 pm, Fri, 20 September 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI