मराठवाड्यातील एकमेव जिल्ह्यात लेवल 3 चे निर्बंध, बीड जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या प्रत्येकाची आता अँटिजन टेस्ट

बीड जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येकाची आता अँटिजन टेस्ट करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठवाड्यातील एकमेव जिल्ह्यात लेवल 3 चे निर्बंध, बीड जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या प्रत्येकाची आता अँटिजन टेस्ट
बीड जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येकाची अँटिजन चाचणी होणार
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 5:02 PM

बीड : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पॉझिटिव्हिटी रेट कमी होत नसल्यामुळे राज्यातील 11 जिल्ह्यात लेवल 3 चे कोरोना निर्बंध काम ठेवण्यात आले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल त्याबाबत घोषणा केली आहे. या 11 जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील एकमेव बीड जिल्ह्याचा समावेश आहे. त्यापार्श्वभूमीवर सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलाय. बीड जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येकाची आता अँटिजन टेस्ट करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Everyone will have an antigen test at the Beed district border, Dhananjay Munde’s decision )

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. परंतु बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने निर्बंधांत शिथीलता मिळालेली नाही. जिल्ह्यात रुग्णवाढीचा दर कमी व्हावा, यासाठी कडक उपाययोजना केल्या जाव्यात. तसंच नागरिकांनी घालून दिलेल्या मर्यादांचे काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहनही धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट उभारण्यात येणार

आष्टी, पाटोदा शिरूर तालुक्यात बाधित रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. यावर उपाय म्हणून पोलीस खात्याच्या मदतीने नगर आणि अन्य बाधित जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे जिल्ह्याच्या बॉर्डरवर अँटिजन टेस्ट करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट उभारण्यात येणार आहे. अँटिजेन टेस्टिंग करून मगच बीड जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावा आणि या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासूनच करावी असे निर्देशही मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

राज्यातील 11 जिल्ह्यात लेवल 3 चे निर्बंध

कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झालेल्या आणि पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 25 जिल्ह्यात कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे, तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. तर राज्यातील 11 जिल्ह्यात मात्र लेवल 3 चे निर्बंध कायम असतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या 11 जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे.

पश्चिम महाराष्ट्र – पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर

कोकण – रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर

मराठवाडा – बीड

उत्तर महाराष्ट्र – अहमदनगर

संबंधित बातम्या : 

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात निर्बंधात सूट नाहीच, उलट वाढवले जाणार, काय सुरु, काय बंद?

25 जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता, 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम; राजेश टोपे यांची घोषणा

Everyone will have an antigen test at the Beed district border, Dhananjay Munde’s decision

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.