माझ्या सख्ख्या बायकोपेक्षाही मी…नर्तकीच्या प्रेमात वेड्या बीडच्या उपसरपंचाने मित्राला सांगितले होते धक्कादायक सत्य, म्हणाले…
Beed Crime : माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर वेगवेगळे खुलासे होताना सध्या दिसत आहेत. हे प्रकरण राज्यभर चालत आहे. कला केंद्रात काम करणाऱ्या मुलीसाठी गोविंद बर्गे याने किती मोठे आणि टोकाचे पाऊस उचलले हे यातून स्पष्ट दिसत आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सासुरेगावत थेट कला केंद्रात काम करणाऱ्या नर्तकीच्या घरासमोर स्वत:च्याच चारचाकी गाडीमध्ये बसून आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली. कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्या प्रेमात दीड वर्षापासून गोविंद बर्गे होते. यादरम्यानच्या काळात गोविंदने पूजाला आयफोन, प्लॉट, सोन्याचे नाणे आणि दागिने, बुलेट, शेतजमीन आणि तिचे सासुरे गावातील घर देखील बांधून दिले. मात्र, इतके करूनही पूजाने गोविंदसोबत बोलणे अचानक बंद केले आणि तो थेट नैराश्यात गेला. पूजाला बोलण्यासाठी तो सर्व प्रयत्न करत राहिला.
गोविंद बर्गे याने नर्तकी पूजा गायकवाड हिच्या आईकडेही दया यातना पूजाने बोलाव्या म्हणून केल्या. मात्र, पूजा ही गेवराईतील बंगल्याच्या अटीवर अडली होती. तिला गोविंदचा गेवराईतील बंगला काहीही झाला तरीही पाहिजे होता. पूजा ऐकायला काहीही झाले तरीही तयार नव्हती. यामुळे गोविंद नैराश्यात गेला. गोविंदने आपल्या जवळच्या मित्राला याबद्दल सांगितले देखील. गोविंदने त्याचा जवळचा मित्र चंद्रकांत शिंदे यांना थेट काही गोष्टी बोलून दाखवल्या.
गोविंद बर्गे यांनी मित्र चंद्रकांत शिंदे यांना थेट म्हटले की, मी हिला माझ्या सख्ख्या बायकोपेक्षाही जास्त जीव या पूजाला लावला कितीतरी पैसे, सोन्याचे दागिने आणि नाणी घेऊन दिली, इतके करूनही ती शेतजमीन घेऊन दे किंवा गेवराईचा बंगला नावावर कर नाही तर तुझ्यावर खोटी बलात्काराची केस करते…असे मला म्हणत आहे. मला ती खूप जास्त मानसिक त्रास देत आहे. मागील आठ दिवसापासून तिने माझे इनकमिंग कॉलही बंद केली आहेत.
यासोबतच आत्महत्या करण्याच्या काही वेळ अगोदरच पारगांव येथील तुळजाभवानी कला केंद्रात गोविंद बर्गे हे नर्तकी पूजाला भेटण्यासाठी गेले. मॅनेजरला पूजाला भेटायचे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पूजासोबत भेट होऊ शकत नसल्याने त्यांनी शेवटी पूजाच्या मैत्रीला फोन केला. शेवट ते पूजाच्या आईला भेटण्यासाठी थेट तिच्या घरी पोहोचले. मात्र, पूजासोबत बोलणे होऊ शकत नसल्याने शेवटी आत्महत्या केली.
