AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! खासदार बजरंग सोनावणे यांना मोठा झटका, विलास घुले प्रकरणात मुलाची एसआयटी चौकशी होणार; बीडमध्ये मोठ्या घडामोडींना वेग

बीडमधील विलास घुले हत्याकांडात मोठी अपडेट समोर आली आहे. खासदार बजरंग सोनावणे यांचे पुत्र सौरभ सोनावणे यांची विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी होणार आहे. फिर्यादीच्या पुरवणी जबाबात नाव आल्याने सौरभ सोनावणे आज केज पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर राहणार आहेत. या चौकशीनंतर एसआयटी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोठी बातमी ! खासदार बजरंग सोनावणे यांना मोठा झटका, विलास घुले प्रकरणात मुलाची एसआयटी चौकशी होणार; बीडमध्ये मोठ्या घडामोडींना वेग
| Updated on: Jun 27, 2026 | 9:50 AM
Share

बीडमधील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुवले हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याप्रकरणात खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलाची एसआयटीकडून चौकशी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विलास घुले हत्याप्रकरणी सौरव सोनावणे यांची चौकशी होणार असल्याचं सूत्र सांगत आहेत. सौरव सोनावणे हे आज केज पोलीस ठाण्यात हजर राहून स्वतः चौकशीला सामोरे जाणार असल्याचंही सूत्रांकडून कळतंय. विलास घुले हत्या प्रकरणात फिर्यादीने पुरवणी जबाबात नाव दिलेल्या खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांना चौकशीसाठी एसआयटी ने पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आल्याची माहिती समोर आली. आज दुपारी सौरव सोनवणे स्वतः एसआयटीच्या चौकशीसाठी हजर होतील असं सूत्रांनी सांगितलं आहे.

या आधी देखील खासदार बजरंग सोनवणे आणि सौरव सोनवणे यांनी, पोलीस ज्या ज्या वेळी बोलावतील त्या त्या वेळी सहकार्य करू असं माध्यमांसमोर सांगितले होते. त्यामुळे आज सौरव सोनावणे हे स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर राहणार असल्याची माहिती मिळत आहे. आजच्या चौकशीनंतर एसआयटी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

कालही एसआयटी आणि फॉरेन्सिक टीम ही खासदार बजरंग सोनावणे यांच्या निवासस्थानी दाखल झाली होती. तब्बल तीन तपास यंत्रणांनी तिथे तळ ठोकला होता. आणि आज पुन्हा खा. बजरंग सोनावणे यांचा पुत्र सौरव याची चौकशी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सौरव सोनावणे आज चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये हजर राहतील, असं समजतं. मात्र आजच्या चौकशीनंतर नेमकं काय समोर येणार आणि त्यानंतर पोलिसांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काय आहे प्रकरण ?

केज तालुक्यात 20 जूनच्या रात्री एका दुर्दैवी घटना घडली. दोन गटात सुरू असलेलं भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांच्यावर वार करून हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित कट असून याचा खरा सूत्रधार कोण, याचा शोध घेऊन विलास घुले याला न्याय मिळावा यासाठी केजमध्ये हजारो लोक घुले कुटुंबियांच्या सोबत रस्त्यावर उतरले होते. विलास घुले यांची हत्या झाली त्या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही फुटेजही जप्त करण्यात आलं. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन गट एकमेकांना दगडं, काटेच्या बाट्लया आणि इतर घातक वस्तूने हाणामारी करत असल्याचं दिसून आलं होतं.

या हत्याकांडामुळे मोठी खळबळ माजली असून त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं. याप्रकरणी अनेक आरोप प्रत्यारोप झाले. तर काल दरम्यान आज माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी विलास घुले यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी संताप व्यक्त करत पोलीसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या प्रकरणात 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली, मात्र एका आरोपीला का अटक केली नाही? तो पोलिसांचा लाडका आहे का? असा सवाल यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान