Beed | मुंडेंच्या परळीतले बॅनर पहाच, लोक म्हणतात.. मासे लागले गळाला, नगरसेवक कुठे पळाला? रस्त्यांच्या दुर्दशेने नागरिक हैराण 

परळी शहरात सर्वसामान्य नागरिकांनी लावलेले बॅनर्स लक्ष वेधून घेत आहेत. परळी शहरातील वार्ड क्रमांक पाचमधल्या सिद्धेश्वर नगरातील रस्ते पावसानं चिखलमय झालेत. यातून वाट काढण्याकरिता स्थानिकांना कसरत करावी लागतेय.

Beed | मुंडेंच्या परळीतले बॅनर पहाच, लोक म्हणतात.. मासे लागले गळाला, नगरसेवक कुठे पळाला? रस्त्यांच्या दुर्दशेने नागरिक हैराण 
परळीतल्या बॅनरची चर्चा Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 4:38 PM

बीडः परळी शहरात (Parali) रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. बीड जिल्ह्यात पावसाला उशीराने सुरुवात झाली. अजून पुरेसा पाऊसही (Monsoon) झालेला नाही. मात्र थोड्याशाच पावसामुळे परळी शहरातून इतर ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांचे हाल झाले आहेत. चिखल आणि खड्ड्यांत साठलेल्या पाण्यातून मार्ग काढत नागरिकांना बाहेर निघावे लागत आहे. रस्त्याच्या रोजच्याच समस्येमुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांचा तीव्र निषेध केला. परळीत मध्यवर्ती ठिकाणी बॅनर लावून नगरसेवकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय. मासे लागले गळाला, नगरसेवक कुठे पळाला, असा मजकूर या बॅनरवर लावण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा परळी हा मतदार संघ आहे. मात्र शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेकडे त्यांचं लक्ष नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Parali Road

परळीच्या रस्त्यांची दुर्दशा

परळीतल्या बॅनरची चर्चा

परळी शहरात सर्वसामान्य नागरिकांनी लावलेले बॅनर्स लक्ष वेधून घेत आहेत. परळी शहरातील वार्ड क्रमांक पाचमधल्या सिद्धेश्वर नगरातील रस्ते पावसानं चिखलमय झालेत. यातून वाट काढण्याकरिता स्थानिकांना कसरत करावी लागतेय. त्यामुळेच लोकप्रतिनिधींचं याकडे लक्ष वेधावे याकरिता स्थानिकांनी बॅनर लावलेत. या बॅनरवर कोणी रस्ता देता का… रस्ता… असा उल्लेख करण्यात आलाय. फक्त मत मागायला येता… ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट… या आशयाचा मजकूर लिहिला आहे. हे बॅनर सध्या लक्ष वेधत आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेकडे वेळीच लक्ष देऊन ही समस्या दूर करावी. अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजपने नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी शहरात हे बॅनर झळकत असल्याने याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

मुंडेंच्या परळीतील रस्त्यांची जोरदार चर्चा

परळीत लावण्यात आलेले हे बॅनर्स सध्या गावातील नागरिकांच्या चर्चेचा विषय तर ठरलेच आहेत. मात्र सोशल मीडियावरदेखील या बॅनर्सची चर्चा सुरु आहे. परळीतील रस्त्यांवरही तरुणांनी जोरदार टीका केली आहे.

कोट्यवधींचा निधी, पण बीडचे रस्ते चिखलमयच

बीड शहरातील काही अपवादात्मक रस्ते सोडले असता बहुतांश रस्त्यांची दुरवस्थाच झाली आहे. नगरपालिका आणि बांधकाम विभागाने बीड शहरातील रस्ते तयार करणे तसेच त्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची उधळपट्टी केल्याचा आरोप होतोय. मात्र तरीही रस्त्यांवरील आणि बाजूचा चिखल हटला नाही. या चिखलातून शाळकरी मुले, वृद्ध नागरिकांना चालणं कठीण झालं आहे. अनेक वाहनधारक येथून घसरून पडत आहेत. रिमझिम पावसामुळे बीडकर त्रस्त आहेत.

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.