अबब! 50 फूटांचा हार, जेसीबीवरून फुलांची उधळण, शीघ्र कवी, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं कुठे झालं स्वागत?

शरद पवार यांनी महाविकास आघाडी सोडून भाजपाला पाठिंबा द्यावा, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.

अबब! 50 फूटांचा हार, जेसीबीवरून फुलांची उधळण, शीघ्र कवी, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं कुठे झालं स्वागत?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 2:58 PM

महेंद्रकुमार मुधोळकर, बीड : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas athawale) बीड (Beed) जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. 50 फुटांचा हार, जेसीबी वरून फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी अशा स्वरूपात या उत्साही कार्यकर्त्यांनी आठवलेंचं स्वागत केले आहे. रिपाईचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या बीड शहरातील नूतन कार्यालयाचं आठवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी जिल्ह्यातील कामांचा आढावा आठवले यांनी घेतला. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली असली तरी ती किती टिकेल हे सांगता येत नाही असं भाकीत केलं. प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले असले तरी ते महाविकास आघाडी सरकार मध्ये गेलेले नाहीत. त्यामुळे ते कुठेही गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. तर शरद पवार यांनी नागालँड मध्ये जो पाठिंबा दिला तसा महाराष्ट्रातही द्यावा, महाविकास आघाडीतून बाहेर पडाव,असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलंय.

‘वंचित- ठाकरेगटाची युती टिकाणार नाही’

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत युती केली आहे. महाविकास आघाडी आणि वंचितची युती होईल का, यावरून रामदास आठवले यांनी भाकित वर्तवलं आहे. ते म्हणाले, वंचित-ठाकरेंची युती किती टिकेल हे सांगता येत नाही. महाविकास आघाडीत जातील हे सांगता येत नाही. पण आम्हाला फरक पडत नाही. शिंदे-फडणवीस आणि मी आमच्या तिघांची ताकद आहे. कालच्या निवडणुकीत तिन्ही राज्यात एनडीएचं सरकार आलं आहे. येणारं कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेशात सर्वच ठिकाणी भाजप, एनडीएचं सरकार आणण्याचा प्रयत्न आहे. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कितीही नेते उभे राहिले. तरी त्यांना हरवण्याचं येड्या-गबाळ्याचं काम नाही.

पवारांनी मविआ सोडावी..

शरद पवार यांनी महाविकास आघाडी सोडून भाजपाला पाठिंबा द्यावा, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. ते म्हणाले, नागालँडमध्ये शरद पवार यांनी एनडीएला पाठिंबा दिला. तसा देशात सर्वच ठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला देखील पाठिंबा द्यावा. आपल्यासारखा अनुभवी नेता आमच्या सोबत असला असला पाहिजे, त्यामुळे पवार यांनी महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडावं असं आवाहन आठवले यांनी पवारांना केले आहे.

Non Stop LIVE Update
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?.
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला.
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा.
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?.
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?.
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.