AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपडे फाडले, चेहऱ्यावर लघुशंका केली, हसून सेल्फी घेतली अन्… संतोष देशमुखांच्या हत्येची क्रूरता पाहून तुम्हीही हादराल!

बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली या प्रकरणी, हत्येचा घटनाक्रम दाखवणारे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. फोटोमध्ये आरोपींनी देशमुख यांना केलेली अमानुष मारहाण आणि हत्या कशी केली हे स्पष्टपणे दिसून येते.

कपडे फाडले, चेहऱ्यावर लघुशंका केली, हसून सेल्फी घेतली अन्... संतोष देशमुखांच्या हत्येची क्रूरता पाहून तुम्हीही हादराल!
santosh deshmukh murder case shocking photos
| Updated on: Mar 03, 2025 | 11:49 PM
Share

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा आता समोर आला आहे. संतोष देशमुखांना मारहाण करताना, त्यांची निर्घृण हत्या करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ आता समोर आले आहेत. या फोटोत संतोष देशमुखांची हत्या कशी करण्यात आली, त्यांना कशा पद्धतीने अमानुष मारहाण करण्यात आली, याचा घटनाक्रम समोर आला आहे. या हत्येच्या कटात सहभाग असलेले आरोपीही या फोटोत दिसत आहेत. विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे हे सर्वजण या फोटोत पाहायला मिळत आहे.

संतोष देशमुखांच्या हत्येची क्रूर कहाणी

  • पहिल्या फोटोत जनावरांप्रमाणे मारहाण केल्यानंतर जयराम चाटे संतोष देशमुख यांची पँट काढतोय.
  • दुसऱ्या फोटोत आरोपी महेश केदार हा त्या दृष्याचे सेल्फी घेत हैवानासारखा हसतो.
  • तिसऱ्या फोटोत अमानुष मारहाणीनंतर संतोष देशमुख अर्धमेले झाले, तेव्हा प्रतिक घुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लघवी करतो.
  • सुदर्शन घुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो. त्यावेळी हैवानी आवेश चेहऱ्यावर दिसतोय.
  • मारेकरी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावर शर्ट ओरबाडून काढतो. काढलेला शर्ट हातात धरुन हसतो.
  • यानंतर मारेकरी पाईप आणि वायरने देशमुखांवर वार करतात. लाथा-बुक्क्यांनी मारहाण शिवीगाळ होते.
  • वायरीसारख्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारुन वार केले जात आहेत
  • दृश्य पाहून जल्लाद – राक्षसांना पाझर फुटेल, अशावेळी महेश केदार सारं हसत हसत शूट करतो.
  • मारहाणीनंतर सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे, असं देशमुखांनी म्हणावं, यासाठी त्यांना जबरदस्ती केली जाते.
  • संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवून त्यांच्या पाठीवर पाईपने मारहाण होते.
  • हैवानासारख्या मारहाणीनंतर देशमुखांना शरीरातील रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचे दिसतंय

बीडमधील वातावरण पुन्हा एकदा तापले

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे 8 फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीडमधील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. हे सर्व फोटो संवेदनशील आहेत. त्यामुळे हे फोटो आम्ही प्रसिद्ध करु शकत नाही. तसेच ‘टीव्ही 9 मराठी’ या फोटोंना दुजोरा देत नाही.

बीडचे एसपी नवनीत कॉवत यांचे आवाहन

हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता बीडचे एसपी नवनीत कॉवत यांनी जनतेला आवाहन केले आहे. समाज माध्यमांवरील फोटो मन विचलित करणार आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. जनतेने कायदा हाती घेऊ नये, असे आवाहन बीडचे एसपी नवनीत कॉवत यांनी केले आहे.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.