टॅब न दिल्याने आत्महत्या केलेल्या शेतकरीपुत्राला दहावीत 81 टक्के, निकाल ऐकून माऊलीने हंबरडा फोडला

बीडच्या गेवराई तालुक्यातील भोजगावमध्ये राहणाऱ्या अभिषेक संत या विद्यार्थ्याने जून महिन्यात आत्महत्या केली होती.

टॅब न दिल्याने आत्महत्या केलेल्या शेतकरीपुत्राला दहावीत 81 टक्के, निकाल ऐकून माऊलीने हंबरडा फोडला

बीड : शेतकरी पित्याने टॅब घेऊन न दिल्यामुळे आत्महत्या केलेल्या बीडमधील दहावीच्या विद्यार्थ्याला 81 टक्के गुण मिळाले. परीक्षेत मिळालेलं घवघवीत यश पाहण्यासाठी अभिषेक या जगात नसल्याने संत दाम्पत्य गहिवरले. अभिषेकचे गुण ऐकून आईने अक्षरशः हंबरडा फोडला. (Beed Student who committed Suicide for tab passed SSC exam with flying colors)

बीडच्या गेवराई तालुक्यातील भोजगावमध्ये राहणाऱ्या अभिषेक संत या विद्यार्थ्याने जून महिन्यात आत्महत्या केली होती. ऑनलाईन शिक्षणासाठी शेतकरी पित्याने टॅब घेऊन दिला नाही म्हणून अभिषेक नाराज झाला होता. अभिषेकने घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती.

अभिषेक दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. काल जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात अभिषेकने 81 टक्के गुण मिळवल्याचे समोर आले. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या आई वडिलांना त्याचा निकाल ऐकून अश्रू अनावर झाले.

नेमकं काय झालं होतं?

खरीप हंगामाची लगबग सुरु होती. त्याच वेळी अभिषेकने शेतकरी वडिलांना टॅब घेऊन देण्याचा तगादा लावला होता. खत बी बियाणे घेण्यासाठीच शेतकऱ्याने उसनवारी पैसे आणले होते. त्यावेळी पेरणी झाल्यावर टॅब घेऊन देतो, असं शेतकरी बापाने पोराला सांगितलं होतं. मात्र हताश झालेल्या आणि हट्ट धरलेल्या मुलाने धीर सोडून, थेट गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

ज्याच्यासाठी बाप शेतात राबराब राबतोय, त्याच पोराने आत्महत्या केल्याने शेतकरी बाप पुरता हडबडून गेला होता. दहावीचा निकाल लागला त्यावेळीही हे शेतकरी कुटुंब शेतात राबत होतं. मुलगा जगातच नसल्याने या कुटुंबाने निकालाकडे लक्ष दिले नाही.

शाळेतील शिक्षकांनी अभिषेकचा निकाल पाहून गावातील नागरिकांना कळवले. काही वेळातच निकालाची एक प्रत घेऊन गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली. पोराने 81 टक्के गुण घेतल्याचे कळताच आईने हंबरडा फोडला.

हेही वाचा : नातींकडून प्रोत्साहन, इचलकरंजीचे आजोबा दहावी उत्तीर्ण, वयापेक्षा अधिक टक्के

ऑनलाईन शिक्षणाचा फार्स एका गुणी विद्यार्थ्याचा जीव घेऊन गेला. टॅबसाठी वेळीच मदत मिळाली असती तर आज अभिषेक या जगात राहिला असता अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली.

संबंधित बातमी :

बाळा, पेरणी झाल्यावर टॅब घेऊन देतो, शेतकरी बापाचा शब्द टाळला, शाळकरी मुलाची आत्महत्या

(Beed Student who committed Suicide for tab passed SSC exam with flying colors)

Published On - 12:33 pm, Thu, 30 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI