Beed News:आई-बहिणीनंतर एकुलत्या एक मुलाचेही प्राण गेले, बीडमधलं मुंगुसवाडा गाव सुन्न!

बीडमधील पाथर्डी तालुक्यातील मुंगुसवाडा गावातील एका कुटुंबावर एकानंतर एक अपघातांची मालिकाच सुरु आहे. काही दिवसांपूर्वी या कुटुंबातील आणि बहिणीचा शेतात पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला होता. तर आता कुटुंबातील एकुलता एक 13 वर्षाचा मुलगाही वीजेच्या धक्क्याने दगावला.

Beed News:आई-बहिणीनंतर एकुलत्या एक मुलाचेही प्राण गेले, बीडमधलं मुंगुसवाडा गाव सुन्न!
वीजेच्या धक्क्याने राम हिंगे या मुलाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 4:45 PM

बीडः बीडमधील पाथर्डी तालुक्यातील मुंगुसवाडा गावातील एका कुटुंबावर एकानंतर एक अपघातांची मालिकाच सुरु आहे. काही दिवसांपूर्वी या कुटुंबातील आणि बहिणीचा शेतात पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला होता. तर आता कुटुंबातील एकुलता एक 13 वर्षाचा मुलगाही वीजेच्या धक्क्याने दगावला. एकानंतर एक असा दुर्दैवी घटना घडल्याने अवघं मुंगसवाडा गाव हळहळ व्यक्त करत आहे. हे तिन्ही मृत्यू शेतातच घडल्याने शेतच कुटुंबासाठी कर्दनकाळ ठरलं, अशी चर्चा गावात सुरु आहे.

वीजेच्या धक्क्याने एकुलत्या एक मुलाचा मृत्यू

पाथर्डी तालुक्यातील मुंगुंसवाडा गावात ही दुर्दैवी घटना घडली. राम नारायण हिंगे (वय 13 ) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान या मुलाच्या आईसह बहिणीचा काही दिवसांपूर्वीच विहिरीत बुडून दुर्दैवी अंत झाला होता. या घटनेला काही दिवस लोटत नाही तोच हि दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मयत राम हिंगे हा इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता. तो आज शाळेत जाण्याऐवजी शेतात काम करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचा विजेचा शाँक लागल्याने जागीच मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी या दुदैवी मुलाची आई व बहीण शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा पिण्यासाठी विहीरीतून पाणी काढताना बहीन पाय घसरून विहीरीत पडली तर तिला वाचवण्यासाठी तिच्या आईने विहिरीत उडी घेतली होती. मात्र या घटनेत दोघी मायलेकींचा करुण अंत झाला होता. दरम्यान या घटनेचा विसर पडत नाही तोच पुन्हा आज या कुटूंबामधील एकुलता एक मुलाचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

इतर बातम्या-

अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का? चंद्रकांत पाटलांवर पेडणेकर भडकल्या, रश्मी ठाकरेंवरच्या प्रश्नाला उत्तर

अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला, तर 4 दिवसांत राज्य विकतील; पडळकरांची टीका, सरकारच्या आशीर्वादानं परीक्षा घोटाळा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.